प्रचाराला ‘लसणा’ची फोडणी, घसरलेल्या किमतीने शेतकरी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 05:00 AM2018-12-02T05:00:59+5:302018-12-02T05:01:15+5:30

राजस्थानातील प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पिकाच्या घसरलेल्या किमतीचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करून केंद्र व राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.

The procession of 'garlic', proportional to the farmers, reduced to Rs | प्रचाराला ‘लसणा’ची फोडणी, घसरलेल्या किमतीने शेतकरी हैराण

प्रचाराला ‘लसणा’ची फोडणी, घसरलेल्या किमतीने शेतकरी हैराण

Next

- असीफ कुरणे
जयपूर : राजस्थानातील प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पिकाच्या घसरलेल्या किमतीचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करून केंद्र व राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेले पीक म्हणजे लसूण. यंदाच्या प्रचारात लसणाची फोडणी जरा जास्तच बसली आहे. त्याचा ठसका कोणाला लागतो, हे ११ डिसेंबरला स्पष्ट होईल.
मध्य प्रदेशच्या मंदसौर येथे २०१७ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाचा मुख्य मुद्दा होता लसणाच्या घसणाऱ्या किमती. येथे पोलीस गोळीबारात सहा शेतकºयांचा बळी गेला होता. एक वर्षांनंतरही लसणाच्या किमती अजून घसरत असून, त्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. राजस्थानच्या पूर्वेकडील हाडोती भागात लसूण हे प्रमुख पीक आहे. या भागातून देशाच्या एकूण लसूण उत्पादनाच्या ४५ टक्के उत्पादन होते. लसणाचा भाव २०१६ मध्ये एका किलोला १०० रुपये होता. लसूण हे या भागातील नगदी पीक असून, उत्तम प्रतीच्या एका किलो लसणाला १३० रुपये किलो असा दरही मिळत होता. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी हे पीक घेतात.
मात्र, नोव्हेंबर २०१६ मध्ये लागू झालेल्या नोटाबंदीनंतर परिस्थितीत कमालीचा बदल झाला आहे. नोटाबंदीमुळे सर्वच शेतीमालाच्या किमती घसरल्या. राजस्थानमध्ये १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रामुख्याने लसणाची लागवड केली जाते. हे क्षेत्र २०१६ मध्ये ६९ हजार हेक्टर एवढे होते. मे २०१८ मध्ये बंपर उत्पादन झाल्यामुळे लसणाच्या किमतीत घसरण सुरू झाली. लसणाचा दर एका किलोला दोन रुपये किलो एवढा खाली आला. आधी १०० रुपये किलोवरून पाच रुपये किलो अशा किमती झाल्याने लसूण उत्पादक शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली. उत्पादन खर्च निघणे दूर, मार्केटमध्ये शेतकºयांना पदरचे पैसे मोजावे लागले.
राजस्थान सरकारने शासकीय पातळीवर ३२ रुपये दराने लसूण खरेदी सुरू केली होती. पण, सरकारने एकूण उत्पादनाच्या निम्माच (७० हजार मेट्रिक टन ) लसूण खरेदी केला. हरभºयाचीही अशीच स्थिती असून त्याचा भाव प्रति क्विंटल ४००० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
>बंपर उत्पादन आले अंगाशी
लसूण, सोयाबीन, गहू , चना यासारख्या पिकांचे उत्पादन राजस्थानात वाढल्याने त्यांचे भाव पडत आहेत. वाढलेल्या उत्पादनामुळे शेतकºयांना योग्य हमीभाव मिळविण्यात अडचणी येत आहेत. हरभरा, लसणाच्या किमती दोन वर्षांपूर्वी ९ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्या होत्या. आॅक्टोबर २०१८ मध्ये हरभरा ४१०० रुपये क्विंटल तर लसूण २३०० रुपये प्रति क्विंटल असे घसरले होते. यामुळे २०१८ मध्ये राजस्थानातील हाडोती भागात लसणाच्या पाच उत्पादक शेतकºयांनी आत्महत्या केली.

Web Title: The procession of 'garlic', proportional to the farmers, reduced to Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.