सिडको, सातपूर, नाशिकरोडला मिरवणूक

By Admin | Published: April 15, 2016 01:55 AM2016-04-15T01:55:09+5:302016-04-15T23:38:43+5:30

सातपूर : स्वारबाबानगर येथून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या मंडळाचा चित्ररथ, राजवाडा मंडळाचा चित्ररथ, कोब्रा फ्रेंड सर्कल हे चित्ररथ सहभागी झाले होते. मिरवणुकीचा शुभारंभ सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंेडे, प्रभाग सभापती सविता काळे, मनपा स्थायी समिती सभापती सलीम शेख, नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मिरवणूक स्वारबाबानगर, राजवाडा, शिवाजी चौक, शिवाजी मंडईमार्गे काढण्यात आली होती. मिरवणुकीत हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते.

Procurement at CIDCO, Satpur, Nashik Road | सिडको, सातपूर, नाशिकरोडला मिरवणूक

सिडको, सातपूर, नाशिकरोडला मिरवणूक

googlenewsNext

सातपूर : स्वारबाबानगर येथून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. या मिरवणुकीत नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या मंडळाचा चित्ररथ, राजवाडा मंडळाचा चित्ररथ, कोब्रा फ्रेंड सर्कल हे चित्ररथ सहभागी झाले होते. मिरवणुकीचा शुभारंभ सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंेडे, प्रभाग सभापती सविता काळे, मनपा स्थायी समिती सभापती सलीम शेख, नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मिरवणूक स्वारबाबानगर, राजवाडा, शिवाजी चौक, शिवाजी मंडईमार्गे काढण्यात आली होती. मिरवणुकीत हजारो भीमसैनिक सहभागी झाले होते.
सिडकोतही मिरवणूक
सिडको परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा प्रारंभ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आला. ही मिरवणूक महाकाली चौक राजरत्न चौक, रायगड चौक, सावतानगर मार्गे, त्रिमूर्ती चौकात आली. मिरवणुकीत डीजेच्या तालावर आबालवृद्धांनी ठेका धरला होता. समितीचे अध्यक्ष संजय गांगुर्डे, संतोष सोनपसारे, सुनील जगताप, विनोद भडांगे, संजय भामरे, अनिल आठवले, दीपक मोकळ, सुमन जाधव आदि सहभागी झाले होते. सिडकोत १२ मंडळांनी मिरवणुका काढल्या. एकूण २३ मंडळांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन केले.

नाशिकरोडला जयजयकार
डॉ. बाबासाहेेबांचा जयजयकार, फटाक्यांची आतषबाजी निळीची उधळण, लाडूचे वाटप, ढोलताश्यांचा गजरात नाशिकरोड परिसरात डॉ. आंबडकरांची जयंती उत्साहात पार पडली. नाशिकरोड पोलीस ठाणे येथे रात्री ८ वाजता सार्वजनिक उत्सव समिती व सुभाष रोड मित्रमंडळाच्या चित्ररथापुढे पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत सिन्नर फाटा मित्रमंडळ, किरण मित्रमंडळ, सिद्धार्थ एकता मित्रमंडळ, संघमित्रा महिला मंडळ, भीमगर्जना मित्रमंडळ, भारत भूषण सोशल फाउंडेशन, धम्मरत्न मित्रमंडळ, त्रिशरण मित्रमंडळ आदिंसह ३५ चित्ररथ सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर बसपा, भाजपा, मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, पिपल्स रिपाइं, रिपाइं गवई आदि पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चित्ररथांचे स्वागत केले. आंबेडकर पुतळा ते शिवाजी पुतळा येथे सार्वजनिक उत्सव समितीतर्फे चित्ररथ व आंबेडकर अनुयायांचे स्वागत करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: Procurement at CIDCO, Satpur, Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.