निर्माता, दिग्दर्शक अर्जुन हिंगोरानी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 05:12 AM2018-05-07T05:12:49+5:302018-05-07T05:12:49+5:30
‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या १९६० साली बनविलेल्या चित्रपटात भूमिका देऊन अभिनेता धर्मेंद्र यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले करणारे या चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माता अर्जुन हिंगोरानी यांचे उत्तर प्रदेशमधील वृंदावन येथे शनिवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
मुंबई : ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या १९६० साली बनविलेल्या चित्रपटात भूमिका देऊन अभिनेता धर्मेंद्र यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले करणारे या चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माता अर्जुन हिंगोरानी यांचे उत्तर प्रदेशमधील वृंदावन येथे शनिवारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
अर्जुन हिंगोरानी यांच्या निधनाबद्दल धर्मेंद्र यांनी शोक व्यक्त केला आहे. हिंगोरानी व धर्मेंद्र एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते. धर्मेंद्र यांनी अर्जुन हिंगोरानी यांच्या बरोबरचे एक कृष्णधवल छायाचित्र आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर झळकवून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. धर्मेंद्र यांनी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, मुंबईत आलो होतो तेव्हा मी एकटा होतो. मला हिंदी चित्रपटात पहिली भूमिका अर्जुन हिंगोरानी यांनी दिली. अर्जुन हिंगोरानी यांनी धर्मेंद्र यांना घेऊन कब, क्यूँ और कहाँ (१९७०), कहानी किस्मत की (१९७३), सल्तनत (१९८३), कौन करे कुर्बानी या चित्रपटांचे दिग्दर्शन, निर्मितीही केली.