देशातील व्यावसायिक शिक्षण ठरते बिनकामाचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 04:23 AM2018-03-24T04:23:13+5:302018-03-24T04:23:13+5:30
देशात सर्वाधिक संख्येने असलेल्या युवकांच्या हाती रोजगार येण्यासाठी आयटीआयमार्फत व्यावसायिक शिक्षण दिले जाते. पण हे व्यावसायिक शिक्षण बिनकामाचे असून त्यातून फक्त १८ टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते, असे धक्कादायक चित्र टीमलीज सर्व्हिसेस या कौशल्य विकास क्षेत्रातील संस्थेच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
मुंबई : देशात सर्वाधिक संख्येने असलेल्या युवकांच्या हाती रोजगार येण्यासाठी आयटीआयमार्फत व्यावसायिक शिक्षण दिले जाते. पण हे व्यावसायिक शिक्षण बिनकामाचे असून त्यातून फक्त १८ टक्के विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते, असे धक्कादायक चित्र टीमलीज सर्व्हिसेस या कौशल्य विकास क्षेत्रातील संस्थेच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी, कंपन्या व कॉर्पोरेट जगत या तिन्ही क्षेत्रांचे सर्वेक्षण केले. त्यात हे अभ्यासक्रम नोकरीसाठी उपयुक्त नसल्याचे मत ६० टक्के विद्यार्थी व कंपन्यांनी व्यक्त केले.
हे शिक्षण रोजगारक्षम
नसल्याचे कॉर्पोरेट जगतातील ७२ टक्के मनुष्यबळ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर प्रशिक्षण उद्योगांच्या गरजा पूर्ण करणारे नसल्याचे
४७ टक्के कॉर्पोरेट्सनी सांगितले
तर ४२ टक्के विद्यार्थ्यांनी हे
प्रशिक्षण खराब असल्याचे
सांगितले.
शिक्षण घेणाºया ७६ टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमांचीच
माहिती नाही. चांगल्या नोकरीसाठी ८० टक्के विद्यार्थी पुन्हा दुसरे
प्रशिक्षण घेतात, असे दिसून
आले आहे. एकूण ७८ टक्के
विद्यार्थी व ६६ टक्के कंपन्या हे अभ्यासक्रम काहीच उपयोग नसल्याचे मानतात.
माहिती व तंत्रज्ञानामुळे कामाचे स्वरुप बदलते आहे, उद्योगांची गरजाही बदलत आहे. उद्योगांच्या गरजेनुसार व्यावसायिक शिक्षणात कुठलेच बदल होताना दिसत नाहीत.
या शिक्षणात स्पर्धात्मकतेचा अभाव आहे. यामुळेच व्यावसायिक शिक्षणातून युवक किंवा युवतींना रोजगार मिळत नाही, असे मत टीमलीजच्या वरिष्ठ उपाध्यक्षा नीती शर्मा यांनी व्यक्त केले.
कौशल्य विद्यापीठांचा होईल फायदा
राज्यात सहा कौशल्य विद्यापीठांच्या निर्मितीची घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पात केली. व्यावसायिक अभ्यासक्रमातील दरी भरुन काढण्यासाठी विद्यापीठांचा फायदा होईल, असे नीती शर्मा यांनी सांगितले.