आदित्य ठाकरेंनी म्हटलं कैसे हो! तेजस्वी यादवांनी केले स्वागत; बिहार दौऱ्यात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 05:21 PM2022-11-23T17:21:03+5:302022-11-23T17:21:25+5:30

बिहारमध्ये प्रगती होताना दिसतेय. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात चांगले काम सुरू आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Progress is being made in Bihar, Aditya Thackeray praised after meeting Tejashwi Yadav | आदित्य ठाकरेंनी म्हटलं कैसे हो! तेजस्वी यादवांनी केले स्वागत; बिहार दौऱ्यात काय घडलं?

आदित्य ठाकरेंनी म्हटलं कैसे हो! तेजस्वी यादवांनी केले स्वागत; बिहार दौऱ्यात काय घडलं?

googlenewsNext

मुंबई - युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. आदित्य ठाकरेंसोबतशिवसेना खासदार अनिल देसाई, प्रियंका चर्तुवेदी हेदेखील उपस्थित होते. आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यामुळे आगामी पालिका निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे बिहारला पोहचताच पटना येथे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी पोहचले. तेव्हा आदित्य यांच्या स्वागतासाठी तेजस्वी यादव स्वत: बाहेर उभे होते. 

आदित्य ठाकरेंची गाडी पोहचल्यानंतर हे दोन्ही नेते आमनेसामने आले. तेव्हा आदित्य यांनी कैसे हो असा प्रश्न तेजस्वी यादवांना केला. तेव्हा तेजस्वी यादव यांनी Very Well, Welcome म्हणत त्यांना घरात घेऊन गेले. त्याठिकाणी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पहिल्यांदाच तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे भेटणार त्यामुळे याठिकाणी माध्यमांचीही बरीच गर्दी होती. 

या बैठकीनंतर आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलले की, आम्ही एकमेकांशी फोनवरून संपर्कात होतो. कोविड असल्याने आमची भेट झाली नाही. बिहारमध्ये प्रगती होताना दिसतेय. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात चांगले काम सुरू आहे. बोलणं व्हायचं पण आज भेट झाली. वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. पर्यावरण, विकासाच्या कामावर चर्चा झाली असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राजकीय चर्चा झाली नाही. परंतु देशातील महागाई, रोजगार याविरोधात तरुणांनी एकटवलं पाहिजे. सर्वांनी एकत्र काम केले तर देशात काहीतरी चांगले घडेल. भेट होणं महत्त्वाचं होतं. आमचे कौटुंबिक संबंध होते. ही मैत्री यापुढेही कायम राहील. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. आता येणे-जाणं होत राहील. तेजस्वी यादव यांना मुंबई भेटीचं निमंत्रण दिले आहे. तेजस्वी यादव लंबी रेस के घोडे आहे असं कौतुक आदित्य ठाकरेंनी केले. 

देशात तरुण नेत्यांची मजबूत फळी उभारणार
तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांच्या मदतीनं राजकीय परिवर्तन केलंय. अशा तरूण नेत्यांना भेटून देशात मजबूत फळी उभारण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करतायेत. त्यात त्यांना यश मिळतंय. देशातील प्रमुख नेत्यांना आदित्य ठाकरेंशी संवाद साधायचा आहे. अखिलेश यादव, अभिषेक बॅनर्जी इतर राज्यातील प्रमुख नेत्यांना आदित्य ठाकरे भेटणार आहे. या देशात समर्थ पर्याय उभं करण्याच्या दृष्टीने ही राष्ट्रीय रणनीती आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"


 

Web Title: Progress is being made in Bihar, Aditya Thackeray praised after meeting Tejashwi Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.