प्रगती समाधानकारक नाही : संयुक्त राष्ट्र
By admin | Published: March 9, 2017 12:44 AM2017-03-09T00:44:21+5:302017-03-09T00:44:21+5:30
जगातील महिलांनी केलेल्या आंदोलनाचे कौतुक करतानाच संयुक्त राष्ट्र संघाने महिलांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी केलेली प्रगती समाधानकारक नसल्याचे
संयुक्त राष्ट्र : जगातील महिलांनी केलेल्या आंदोलनाचे कौतुक करतानाच संयुक्त राष्ट्र संघाने महिलांच्या अधिकाराच्या संरक्षणासाठी केलेली प्रगती समाधानकारक नसल्याचे म्हटले आहे. ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी, असा इशाराही देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रातील मानवाधिकारांचे उच्चायुक्त जैदी बिन राद अल हुसैन यांनी जागतिक महिला दिनानिमित्त बोलताना म्हटले आहे की, मोठ्या संख्येने महिला आपल्या अधिकारासाठी एकजूट होत आहेत. अर्जेंटिना, पोलँड, सौदी अरेबिया येथील महिलांनी केलेल्या आंदोलनाचे कौतुक केले. भारतात लैंगिक हिंसेविरुद्ध महिला आंदोलन करत आहेत. ही वेळ प्रगती करण्याची आणि सकारात्मक गती ठेवण्याची आहे, असेही ते म्हणाले.