पीएफ संदर्भातल्या निर्णयांना 31 जुलै पर्यंत स्थगिती
By admin | Published: April 19, 2016 12:16 PM2016-04-19T12:16:16+5:302016-04-19T16:21:01+5:30
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यावरील प्रस्तावित कठोर निर्बंध शिथिल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - वयाच्या 58व्या वर्षापर्यंत भविष्य निर्वाह निधीची रक्कम काढता येणार नाही, या नियमाला कडाडून विरोध झाल्यामुळे केंद्र सरकारने या नियमाच्या अमलबजावणीला 31 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. बेंगळूरमध्ये तर कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध केला. यावेळी झालेल्या हिंसाचारात काही बसगाड्यांनाही आग लावण्यात आल्याचे वृत्त आहे.
येत्या तीन महिन्यांत संबंधितांशी चर्चा करण्यात येईल, तोपर्यंत नवीन नियम स्थगित करण्यात आला असल्याचे केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले. सरकारने नव्या घराच्या खरेदीसाठी, वैद्यकीय उपचारासाठी तसेच मुलांच्या अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी कर्मचा-यांना आता भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढता येईल, असे म्हटले होते. पीएफची रक्कम म्हतारपणाचा आधार असल्यामुळे ५८ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण रक्कम काढता येण्याची अट केंद्र सरकारने लागू केली होती. मात्र, यास तीव्र विरोध होत आहे.
Bengaluru:Garment factory workers protest against Govt decision of withdrawal of PF,damage vehicles(earlier visuals) pic.twitter.com/uy6LOdmQsP
— ANI (@ANI_news) April 19, 2016
WATCH: Police use tear gas shells as protest by garment factory workers in Bengaluru turns violenthttps://t.co/mvTMWG5IyX
— ANI (@ANI_news) April 19, 2016