मॅनकाइंड फार्माचे बुर्ज खलिफावर प्रोजेक्शन!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 08:01 AM2023-07-23T08:01:45+5:302023-07-23T08:01:59+5:30
प्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी मॅनकाइंड फार्माने दुबईतील जगप्रसिद्ध टॉवर बुर्ज खलिफावर ‘व्हिडीओ प्रोजेक्शन’ करून सर्वांनाच चकित करून टाकले.
नवी दिल्ली : प्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी मॅनकाइंड फार्माने दुबईतील जगप्रसिद्ध टॉवर बुर्ज खलिफावर ‘व्हिडीओ प्रोजेक्शन’ करून सर्वांनाच चकित करून टाकले. २० जुलै रोजी रात्री ९:४५ वाजता जगातील सर्वांत उंच इमारतीवर ‘मॅनकाइंड फार्मा’ ही अक्षरे उमटली आणि हजारो लोकांनी मंत्रमुग्ध होऊन हा सोहळा अनुभवला.
या सोहळ्याचे लाइव्ह ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या यू ट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात आले. या डिस्प्लेमध्ये मॅनकाइंड फार्माच्या ब्रँडचा प्रवास प्रतिबिंबित झालाच; पण कंपनीचा नावीन्याचा ध्यास आणि आरोग्य क्षेत्रातील कार्य याचीही प्रचिती जगाला आली. मॅनकाइंड फार्मा किफायतशीर दरात सर्वोत्तम दर्जाची औषधी उपलब्ध करून देते.
मॅनकाइंड फार्माचे सीईओ राजीव जुनेजा यांनी सांगितले की, दुबईतील बुर्ज खलिफावर अद्भूत व्हिडीओ प्रोजेक्शन करणे हा आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. मॅनकाइंड फार्माची गुणवत्ता आणि नावीन्य या बाबतीतली कटिबद्धता यातून प्रतिबिंबित होते. किफायतशीर किमतीत उच्च दर्जाची औषधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीतील आमचे समर्पण या यशातून जगासमोर आले आहे. जगाच्या आरोग्य क्षेत्रावर आम्ही जो सकारात्मक ठसा उमटवला आहे, त्याचे हा भव्य सोहळा प्रतीकच ठरला आहे. (वा. प्र.)