हॉकर्सप्रकरणी सुनावणी लांबणीवर

By admin | Published: February 29, 2016 10:01 PM2016-02-29T22:01:40+5:302016-02-29T22:01:40+5:30

जळगाव : हॉकर्सला दिलेल्या जागेविरोधात विसनजी नगरवासीयांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी होऊ शकली नाही. याप्रकरणी आता १० मार्च २०१६ रोजी सुनावणी होणार आहे.

Prolong the hearing of the Hawkers case | हॉकर्सप्रकरणी सुनावणी लांबणीवर

हॉकर्सप्रकरणी सुनावणी लांबणीवर

Next
गाव : हॉकर्सला दिलेल्या जागेविरोधात विसनजी नगरवासीयांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सोमवारी सुनावणी होऊ शकली नाही. याप्रकरणी आता १० मार्च २०१६ रोजी सुनावणी होणार आहे.
जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांचे निधन झाल्याने सोमवारी न्यायालयाच्या पहिल्या सत्राचे कामकाज बंद ठेवण्यात आले होते. महापालिकेने विसनजी नगरातील इंडो-अमेरिकन हॉस्पिटलच्या गल्लीत हॉकर्सला दिलेल्या जागेविरोधात येथील रहिवाशांनी न्यायालयात दाद मागितली आहे. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी याठिकाणी बेकायदेशीररीत्या आखणी करून हॉकर्सना बसवण्यासाठी जागा निि›त केली आहे. त्यामुळे नेहमीच्या वापरत्या वहिवाटीस बाधा पोहोचेल व हॉकर्समुळे त्रास होईल, अशा आशयाची हरकत येथील १८ ते २० रहिवाशांनी घेतली आहे. न्यायाधीश आर.एम. निर्लिकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाचे कामकाज सुरू आहे. महापालिकेच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड.केतन ढाके तर विसनजीनगरवासीयांतर्फे ॲड.के.बी. वर्मा काम पाहत आहेत.

Web Title: Prolong the hearing of the Hawkers case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.