भाजपच्या व्यासपीठावर प्रामुख्याने शीख चेहरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 06:15 AM2022-01-17T06:15:01+5:302022-01-17T06:15:21+5:30
- बलवंत तक्षक चंडीगड : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात शीख चेहरे पुढे केले जात आहेत. या शीख ...
- बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात शीख चेहरे पुढे केले जात आहेत. या शीख चेहऱ्यांमध्ये बहुसंख्य माजी मंत्री आणि काही दिवसांपूर्वी इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेले माजी आमदार आहेत.
शीख चेहऱ्यांना मिळणारे महत्त्व पाहून पक्षाचे कार्यकर्ते काहीसे अस्वस्थ झालेले दिसतात. २०१७ मध्ये सत्तेविरोधी लाट असतानाही विधानसभा निवडणूक जिंकलेल्या भाजपच्या २ आमदारांना यावेळी पक्षात मोठी उपेक्षा होत आहे. या शीख चेहऱ्यांमध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्यांमध्ये राणा गुरमीत सिंग सोढ़ी, माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांचे ओएसडी राहिलेले परमिंदर सिंग बराड़, आमदार फतेहजंग सिंग बाजवा यांचा समावेश आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि माजी केंद्रीय मंत्री सुखदेव सिंग ढिंढसा यांना भाजप विशेष स्थान देत आहे.