सपाच्या जाहीरनाम्यात आश्वासनांचा पाऊस
By admin | Published: January 22, 2017 01:20 PM2017-01-22T13:20:10+5:302017-01-22T13:20:10+5:30
हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपबरोबरच स्मार्टफोन, कुकर, गरिबांना मोफत धान्य अशा अनेक घोषणांचा पाऊस
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि, 22 - हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपबरोबरच स्मार्टफोन, कुकर, गरिबांना मोफत धान्य अशा अनेक घोषणांचा पाऊस अखिलेश यादव यांनी आज जाहीर केलेल्या समाजवादी पडला. मात्र मुलायम सिंग यादव यांच्या कार्यक्रमातील अनुपस्थितीमुळे सपामध्ये अद्यापही सगळे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.
अखिलेश यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात लहान मुले महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी काही ना काही घोषणा करण्यात आली आहे. कुपोषित मुलांसाठी तूप, महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सूट, विमानतळांवर एअर अॅम्ब्युलन्सची सुविधा, गरिबांना मोफत गहू आणि तांदूळ अशा अनेक घोणषा अखिलेश यादव यांनी जाहीरनाम्यातून केल्या आहेत. तसेच हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपबरोबरच स्मार्टफोन, तसेच स्टार्टअप योजना, शेतकऱ्यांच्या जनावरांवर उपचार करण्यासाठी अँम्ब्युलन्समधून डॉक्टर पाठवण्याची सुविधा, चौकीदार, सुरक्षारक्षकांचे मानधन वाढवण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे.
कार्यक्रमाला मुलामय यांची अनुपस्थिती
समाजवादी पार्टी आणि यादव कुटुंबीयातील मतभेद मिटल्याचे मानण्यात येत असतानाच आज झालेल्या समाजवादी पार्टीच्या जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमाला मुलायम सिंग यादव अनुपस्थित राहिले. मुलायम यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या कार्यक्रमापूर्वी आझम खान मुलायम यांना आणण्यासाठी गेले होते, पण मुलायम आले नाहीत. अखेर मुलायम यांच्या अनुपस्थितीतच अखिलेश यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला.