कोणीही निरक्षर राहू नये, हे आजोबांचं स्वप्न; नातवाने केलं IIT टॉप, मिळालं 56 लाखांचं पॅकेज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 06:20 PM2024-01-07T18:20:33+5:302024-01-07T18:21:42+5:30

सत्यमचे आजोबा दिवंगत दीनानाथ पांडेय यांचं स्वप्न होतं की अटारासह आसपासच्या भागातील एकही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये.

promising student from banda in up has topped iit kharagpur got package worth lakhs | कोणीही निरक्षर राहू नये, हे आजोबांचं स्वप्न; नातवाने केलं IIT टॉप, मिळालं 56 लाखांचं पॅकेज

फोटो - आजतक

उत्तर प्रदेशच्या बांदा येथील एका विद्यार्थ्याने IIT खरगपूरमध्ये टॉप केलं आहे, कठोर परिश्रम आणि समर्पणाने यश कसं मिळतं हे बांदा येथील या विद्यार्थ्याने दाखवून दिलं आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने आपल्या पालकांबरोबरच शिक्षकांना दिलं. सत्यम पांडेय असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याला IIT खरगपूरच्या संचालकांनी सन्मानित केलं आहे. इतर विद्यार्थ्यांना त्याच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. 

सत्यम पांडेय हा यूपीच्या बांदा जिल्ह्यातील अटारा शहराचा रहिवासी आहे. वडील विजय पांडेय यांनी सांगितलं की, सत्यम सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता, त्याने बांदा येथे इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं, त्यानंतर त्याने कानपूरमधून इंटरमिजिएटपर्यंतचे शिक्षण घेतलं आणि नंतर खूप मेहनत करून आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश घेतला. B.Tech आणि M.Tech मध्ये सत्यमने टॉप केलं आहे.

वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यमला 56 लाख रुपयांच्या प्लेसमेंटची ऑफर आली आहे, आता सत्यम बंगळुरूमध्ये आहे. सत्यमने आपला बहुतांश वेळ वाचन आणि लेखनात घालवला, त्यामुळेच त्याला हे यश मिळालं आहे. 

सत्यमने सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की असं कोणतंही काम नाही जे माणूस करू शकत नाही, त्यासाठी फक्त मेहनत आणि झोकून देण्याची गरज आहे, अभ्यास करा, छोट्या नोट्समध्ये ठेवा, परीक्षेच्या वेळी त्या वाचा, ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक परिस्थितीत यश मिळेल. त्याच्या या यशाने कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सत्यमचे आजोबा दिवंगत दीनानाथ पांडेय यांचं स्वप्न होतं की अटारासह आसपासच्या भागातील एकही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांनी अनेक शाळांचा पाया रचला, आता त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची तीन मुलं शाळांचा कारभार पाहत आहेत. वडिलांसह घरातील बहुतेक लोक शिक्षक आहेत.
 

Web Title: promising student from banda in up has topped iit kharagpur got package worth lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.