सासू विकण्याची वेबसाइटवर जाहिरात!

By admin | Published: November 28, 2015 02:21 AM2015-11-28T02:21:01+5:302015-11-28T02:21:01+5:30

सासू विकणे आहे, अशी एका सुनेने दिलेली एक आॅनलाइन जाहिरात चर्चेचा विषय ठरली आहे. एका नाराज सुनेने खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर ‘मदर इन लॉ इन गुड कंडिशन’ अशा तपशिलासहित ‘सासू विकणे आहे

Promoting the sale of mother-in-law! | सासू विकण्याची वेबसाइटवर जाहिरात!

सासू विकण्याची वेबसाइटवर जाहिरात!

Next

नवी दिल्ली : सासू विकणे आहे, अशी एका सुनेने दिलेली एक आॅनलाइन जाहिरात चर्चेचा विषय ठरली आहे. एका नाराज सुनेने खरेदी-विक्री करणाऱ्या संकेतस्थळावर ‘मदर इन लॉ इन गुड कंडिशन’ अशा तपशिलासहित ‘सासू विकणे आहे’ अशी जाहिरात दिली आहे. त्यात सुनेने सासूचे छायाचित्रही टाकले. ही जाहिरात फायदा डॉट कॉमच्या संकेतस्थळावर झळकताच एकच खळबळ माजली. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता बघता, अगदी काही मिनिटांतच संकेतस्थळावरून ती हटविण्यात आली.
जाहिरात देणारी सून आणि तिची सासू कुठल्या याचा उल्लेख जाहिरातीत नाही. ‘मदर इन लॉ इन गुड कंडिशन’ या टॅग लाइनखाली ही जाहिरात टाकण्यात आली होती. त्यात सुनेने सासूची अनेक ‘गुणवैशिष्ट्ये’ही सांगितली होती. किमतीचा रकाना मात्र रिकामा ठेवण्यात आला होता. मोबदल्यात केवळ डोके आणि मन शांत करणारी पुस्तके हवीत, असेही या जाहिरातीत म्हटले होते. (वृत्तसंस्था)
ही जाहिरात किती वेळ संकेतस्थळावर होती यापेक्षाही ती स्वीकारली कशी, हा अधिक महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित आहे. माणसाची खरेदी-विक्री हा गंभीर गुन्हा असल्याने जाहिरात देणारी सून आणि तिची जाहिरात झळकू देणारी वेबसाइट या दोहोंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे काय आणि कारवाई होणार की नाही, या प्रश्नांची चर्चाही जोरात सुरू झाली आहे.

Web Title: Promoting the sale of mother-in-law!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.