उन्हाळ्यामुळे प्रचारात वाढली टोप्या, छत्र्या, गमछांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 04:19 AM2019-04-21T04:19:54+5:302019-04-21T04:20:12+5:30

गांधी टोपी लोकप्रिय; सर्वच पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा वापर

Promotion of hats, umbrellas, pickles in the campaign | उन्हाळ्यामुळे प्रचारात वाढली टोप्या, छत्र्या, गमछांची मागणी

उन्हाळ्यामुळे प्रचारात वाढली टोप्या, छत्र्या, गमछांची मागणी

Next

नवी दिल्ली/कोइम्बतूर : एके काळी देशात गांधी टोपीची क्रेझ होती. स्वातंत्र्यानंतरही काँग्रेसमधील अनेक नेत्यांच्या डोक्यावर ती टोपी असायची. पण ती राजकारण्यांची नव्हे, तर खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची टोपी बनून गेली. महाराष्ट्रातील वारकरी, शेतकरी तीच टोपी रोज वापरू लागले. गुजरातमधील सामान्य लोक आणि व्यापारी यांनाही गांधी टोपी भावली. खादीचा वापर कमी झाला, तरी गांधी टोपी कायम राहिली.

काळाच्या ओघात गांधी टोपीचा वापर कमीकमी होत गेला. मात्र यंदाच्या निवडणुकांत गांधी टोपीचा वापर पुन्हा खूपच वाढला असल्याचे दिसत आहे. अर्थात, गांधी टोपी पुन्हा लोकप्रिय होण्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २0११ साली दिल्लीत केलेल्या आंदोलनाला दिले जाते. त्या काळात दिल्लीच्या गांधी मैदानावर व संपूर्ण शहरात हजारो लोकांच्या डोक्यावर ‘मै भी अण्णा’ असा मजकूर असलेल्या गांधी टोप्या दिसू लागल्या.

नंतर दिल्लीत आम आदमी पक्षाने तर गांधी टोपी आपलीशी केली आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, खा. संजय सिंग यांच्यापासून आम आदमी पक्षाचे सारेच नेते व कार्यकर्ते यांच्या डोक्यावर गांधी टोपी आली. अर्थात त्या गांधी टोपीवर आम आदमी पार्टी व त्यांचे निवडणूक चिन्ह खराटा (झाडू) छापलेले असते. आजही दिल्लीतील आपचे कार्यकर्ते व नेते त्या टोप्या घालूनच प्रचार करताना दिसत आहे. शिवाय कडक उन्हाळ्यात या टोपीमुळे डोक्याचेही संरक्षण होत आहे.

पण आम आदमी पार्टीच नव्हे, तर यंदा काँग्रेसचीही वेगळी गांधी टोपी आली आहे. ती पूर्वीप्रमाणे पांढरी शुभ्र नसून, तिरंगी आहे. त्यावर हात हे निवडणूक चिन्हही आहे. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव व अखिलेश यादव कायम लाल रंगाची टोपी डोक्यावर परिधान करतात. पण निवडणुकीसाठी आलेल्या लाल टोपीवर सायकल हे निवडणूक चिन्ह आहे. अलीकडील काळात महात्मा गांधी यांचे उघडपणे कौतुक करणाºया भाजपचीही गांधी टोपी आहे. संपूर्ण उत्तर भारतात तसेच गुजरात व महाराष्ट्रात उन्हाळा सुरू होताच, पुरुष मंडळी डोक्याला पंचा (गमछा) बांधून बाहेर पडतात. निवडणुका उन्हाळ्यातच आल्याने राजकीय गमछेही बाजारात आले आहेत.

फेंड्ट हॅटलाही मागणी
गांधी टोपीप्रमाणेच फेंड्ट हॅटचीही मागणी वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. भाजप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तृणमूल काँग्रेस या पक्षांकडून या हॅटसाठी अधिक मागणी आहे, असे दिल्ली व कोलकातामधील व्यापाºयांनी सांगितले. तामिळनाडूतील कोइम्बतूरमधील खादी भांडारात प्रत्येक निवडणुकीतच विविध राजकीय पक्षांसाठी गांधी टोप्या बनवण्यात येतात. खादी भांडारातील राजकीय गांधी टोपी सुमारे पाच रुपयांना मिळते, तर दिल्ली, अलाहाबादमधील व्यापारी ती टोपी अवघ्या अडीच रुपयांत विकतात. अर्थात, खादी भांडारातील गांधी टोपीचे कापड जास्त चांगले असते. अर्थात, या टोप्या निवडणुकांपुरत्याच असल्याने त्यासाठी चांगल्या कापडाची गरज काय, असे व्यापारी विचारतात.

रोजगार नाही म्हणून...
केरळ व तामिळनाडूमध्ये उन्हाळ्यात बाहेर पडताना महिला हमखास छत्री घेतात. त्यामुळे यंदा निवडणूक चिन्ह असलेल्या राजकीय छत्र्याही विक्रीला आल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट व द्रमुक या पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांसाठी त्या खास बनवून घेण्यात आल्याचे कोइम्बतूर व कोचीमधील व्यापाºयांनी सांगितले.

Web Title: Promotion of hats, umbrellas, pickles in the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.