प्रचार साहित्य राज्यभर रवाना
By admin | Published: September 30, 2014 12:32 AM2014-09-30T00:32:54+5:302014-09-30T00:32:54+5:30
राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी माजली असतानाच मुंबईतील प्रचार आणि प्रसार साहित्याने कोल्हापूर, पुणो आणि नाशिकर्पयत मजल मारली आहे.
Next
>मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी माजली असतानाच मुंबईतील प्रचार आणि प्रसार साहित्याने कोल्हापूर, पुणो आणि नाशिकर्पयत मजल मारली आहे. राजकीय पक्षांची चिन्हे असलेल्या टोप्या, ङोंडे, टी-शर्ट आणि बिल्ले अशा प्रचार साहित्याचा यामध्ये समावेश असून, सर्वाधिक मागणी टोप्यांना आहे.
महायुती आणि आघाडी अशी युती तुटल्यानंतर साहजिकच राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि मनसे अशा पाच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये लढती रंगल्या आहेत. या पंचरंगी सामन्यांमुळे प्रचार आणि प्रसाराचे साहित्य बनविणा:या कारगिरांनी सर्वच राजकीय पक्षांची चिन्हे आणि नेत्यांच्या छबी असलेल्या टोप्या, शेले, ङोंडे, मोबाइल कव्हर, टी-शर्ट, इकोफ्रेंडली पिशव्या, मोबाइल लेस बाजारात दाखल केल्या आहेत. दक्षिण मध्य मुंबईमधील लालबाग परिसरात राजकीय प्रचार आणि प्रसाराच्या साहित्याची विक्री करणारी बाजारपेठ आहे. विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर येथील बाजारपेठेत प्रचाराचे साहित्य खरेदी करण्यासाठी राजकीय पक्षांची रीघ लागली आहे. विशेष म्हणजे मुंबईबाहेरील कार्यकर्तेही प्रचारासाठी या बाजारापेठेत दाखल होत आहेत.
लालबाग बाजारपेठेतील विक्रीदार एस. ए. तेंडोलकर यांनी यासंदर्भात सांगितले, की गेल्या 1क् दिवसांपासून प्रचार आणि प्रसाराच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकत्र्याची झुंबड उडाली आहे. मुंबईसह राज्यातील कार्यकर्तेदेखील लालबागच्या बाजारपेठेत प्रचाराच्या साहित्याच्या खरेदीसाठी दाखल होत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि मनसे अशा सर्वच राजकीय पक्षांचे प्रचार साहित्य येथील बाजारपेठेत उपलब्ध आहे. यात टोप्या आणि बिल्ले या प्रचार साहित्याला सर्वाधिक मागणी आहे. (प्रतिनिधी)
च्गेल्या 1क् दिवसांत या बाजारपेठेतून नाशिक, पुणो आणि कोल्हापूरलादेखील प्रचाराचे साहित्य रवाना झाले असून, पुढील 15 दिवसांत या प्रचार साहित्याच्या खरेदी-विक्रीला आणखी जोर येणार आहे.
च्सोमवारी दुपारीच येथील एका विक्रीदाराकडून कोल्हापूरमधल्या खरेदीदाराने तब्बल 2क् हजारांचे प्रचार साहित्य खरेदी केले असून, तासागणिक या बाजारपेठेतून तीन हजार टोप्या, दोन हजार शेले, हजार बिल्ले अशा प्रचार आणि प्रसाराच्या साहित्याची खरेदी-विक्री केली जात असल्याचे चित्र आहे.