पाकिस्तानच्या कुरापतींना तत्पर, चोख प्रत्युत्तर द्यावे; काश्मीर सीमाभेटीत संरक्षणमंत्र्यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:36 PM2020-07-18T22:36:03+5:302020-07-19T06:16:59+5:30
लेह-लडाख भेटीनंतर लगेचच संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला लागून असलेल्या सीमाभागाचा दौरा केला.
श्रीनगर : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी काश्मीरच्या सीमाभागाचा दौरा करून अत्यंत दक्षतेने मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांचे कौतुक केले, तसेच पाकिस्तानने सीमेवर काही दुस्साहस केल्यास त्याला तत्परतेने चोख प्रत्युतर देण्याच्या सूचना सैन्यदलांच्या अधिकाऱ्यांना केल्या.
शुक्रवारच्या लेह-लडाख भेटीनंतर लगेचच संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला लागून असलेल्या सीमाभागाचा दौरा केला. राजनाथ सिंह यांनी पुलवामा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर असलेल्या ‘नॉर्थ हिल पोस्ट’ या अत्यंत मोक्याच्या सीमाचौकीस भेट देऊन तेथे तैनात असलेल्या जवानांशीही संवाद साधला.
संरक्षणमंत्र्यांनी स्वत: पोटोसह टष्ट्वीट करून या भेटीची माहिती दिली व अत्यंत खडतर परिस्थितीत मातृभूमीचे रक्षण करणाºया जवानांचा खूप अभिमान वाटतो, असे त्यात लिहिले. तिन्ही सैन्यदलांचे संयुक्त प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे व अन्य वरिष्ठ लष्करी अधिकारीही त्यांच्यासोबत होते.
अमरनाथचे घेतले दर्शन
1 या दौºयात राजनाथ सिंह यांनी पवित्र अमरनाथ गुंफेत जाऊन भगवान शंकराचे दर्शन व आशीर्वादही घेतले. याचा राजनाथ सिंह यांच्या टिष्ट्वटर हॅण्डलवर टाकलेला फोटो पाहिला तर या देवदर्शनाच्या वेळी कोरोनासंबंधीचे नियम धाब्यावर बसविल्याचे दिसते.
2 गुंफेत दर्शन घेताना राजनाथ सिंह, जनरल रावत व जनरल नरवणे यापैकी कोणाच्याही नाका-तोंडावर मास्क नव्हता व हे सर्व जण पुजाºयासह एकमेकांजवळ उभे होते.