दिल्लीत आमदार निधीमध्ये २५० टक्के वाढीचा प्रस्ताव

By admin | Published: September 13, 2016 03:39 PM2016-09-13T15:39:31+5:302016-09-13T15:39:31+5:30

आम आदमी पक्षाच्या सरकारने आमदारांच्या स्थानिक विकास निधीमध्ये २५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

Proposal of 250% increase in MLA fund in Delhi | दिल्लीत आमदार निधीमध्ये २५० टक्के वाढीचा प्रस्ताव

दिल्लीत आमदार निधीमध्ये २५० टक्के वाढीचा प्रस्ताव

Next

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १३ - आम आदमी पक्षाच्या सरकारने आमदारांच्या स्थानिक विकास  निधीमध्ये २५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. सध्या ४ कोटी असलेल्या आमदारांच्या स्थानिक विकास निधीमध्ये १४ कोटी रुपयांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव आपने ठेवला आहे. 
 
मतदारसंघातील स्थानिक विकास कामांसाठी आमदारांकडे पुरेसा निधी असावा यासाठी निधीमध्ये वाढ करावी अशी आपची भूमिका आहे. मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. सध्याच्या नियमानुसार आमदार निधीतील १ कोटी रुपये दिल्ली जल बोर्डाच्या कामासाठी द्यावे लागते. 
 
त्यानंतर  विकासकामांसाठी आमदारांकडे फार कमी निधी रहातो म्हणून दिल्ली सरकारने आमदारनिधीत घसघशीत वाढ सुचवली आहे. २०११ मध्ये शीला दिक्षित सरकारने आमदार निधी दोन कोटीहून चार कोटीपर्यंत वाढवला होता. 
 

Web Title: Proposal of 250% increase in MLA fund in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.