सात नव्या वाळू गटांना मान्यता प्रस्ताव : पर्यावरण व आघात मुल्यांकन प्राधिकरण समितीची बैठक

By admin | Published: March 23, 2016 12:11 AM2016-03-23T00:11:25+5:302016-03-23T00:11:25+5:30

जळगाव : एरंडोल, जळगाव, पारोळा व अमळनेर तालुक्यातील नव्याने सात वाळू गटांना जिल्हास्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण समितीने पर्यावरण विषयक अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी दिली आहे. यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

Proposal for approval of seven new sand groups: Environment and Criminal Assessment Committee meeting | सात नव्या वाळू गटांना मान्यता प्रस्ताव : पर्यावरण व आघात मुल्यांकन प्राधिकरण समितीची बैठक

सात नव्या वाळू गटांना मान्यता प्रस्ताव : पर्यावरण व आघात मुल्यांकन प्राधिकरण समितीची बैठक

Next
गाव : एरंडोल, जळगाव, पारोळा व अमळनेर तालुक्यातील नव्याने सात वाळू गटांना जिल्हास्तरीय पर्यावरण आघात मूल्यांकन प्राधिकरण समितीने पर्यावरण विषयक अटी व शर्तीच्या अधिन राहून परवानगी दिली आहे. यासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
जिल्हास्तरीय तज्ज्ञ मूल्यांकन प्राधिकरण समितीने २०१५/ १६ या वर्षासाठी काही वाळू गटांना मंजुरीची शिफारस केली होती. त्यात जळगाव तहसीलदार यांनी मौजे फुपनगरी, मौजे लमांजन, एरंडोल तहसीलदार यांनी वैजनाथ भाग १, पारोळा तहसीलदारांनी मौजे करमाड तर अमळनेर तहसीलदार यांनी मौजे रुंधाटी भाग २, सावखेडा, खापरखेडा प्र.ज. व मुंगसे या वाळू गटांचा त्यात समावेश होता. या गटांचा पर्यावरणविषयक आढावा घेऊन वरिष्ठ भूवैज्ञानिक भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांनी वाळू उत्खननास अनुमती देण्याबाबत शिफारस केली होती. जिल्हाधिकारी यांनी या सात वाळू गटांना पर्यावरण विषयक अटी व शर्तीच्या अधिन राहून पर्यावरण अनुमती दिलीं असल्याचे अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी कळविले आहे.

Web Title: Proposal for approval of seven new sand groups: Environment and Criminal Assessment Committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.