सुरक्षेची काळजी न घेणार्‍या बॅँकाचा परवाना रद्दचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक : रिझर्व्ह बॅँक व विमा कंपन्यांना देणार प्रस्ताव

By admin | Published: August 14, 2016 01:08 AM2016-08-14T01:08:26+5:302016-08-14T01:08:26+5:30

जळगाव: बॅँकामध्ये होणार्‍या चोर्‍या व दरोड्याच्या घटना घडूनही सुरक्षेच्याबाबतीत पुरेशी खबरदारी न घेणार्‍या बॅँकाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅँकेकडे पाठविला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी गुन्हे आढावा बैठकीनंतर पत्रकारांना दिली. विमा कपंन्यानाही याबाबत कळविले जाणार आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर उपस्थित होते.

Proposal for cancellation of license of bank not taking care of security: Superintendent of Reserve Bank and insurance companies | सुरक्षेची काळजी न घेणार्‍या बॅँकाचा परवाना रद्दचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक : रिझर्व्ह बॅँक व विमा कंपन्यांना देणार प्रस्ताव

सुरक्षेची काळजी न घेणार्‍या बॅँकाचा परवाना रद्दचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक : रिझर्व्ह बॅँक व विमा कंपन्यांना देणार प्रस्ताव

Next
गाव: बॅँकामध्ये होणार्‍या चोर्‍या व दरोड्याच्या घटना घडूनही सुरक्षेच्याबाबतीत पुरेशी खबरदारी न घेणार्‍या बॅँकाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅँकेकडे पाठविला जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी गुन्हे आढावा बैठकीनंतर पत्रकारांना दिली. विमा कपंन्यानाही याबाबत कळविले जाणार आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर उपस्थित होते.
ग्राहकांनी बॅँकेतून रकमा काढल्यानंतर त्या त्याच परिसरातून चोरट्यांनी लांबविल्या आहेत, तर अनेक ठिकाणी रात्री बॅँकेत दरोडे पडले आहेत. या घटना रोखण्यासाठी बॅँकांनी काय काळजी घ्यावी यासाठी बॅँकेच्या अधिकार्‍यांची बैठक घेण्यात आली होती,परंतु त्यानंतरही त्यात सुधारणा झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे. बॅँकामध्ये पुरेसे सुरक्षा नसणे, रात्री सुरक्षा रक्षकच न नेमणे, सीसीटीव्ही कॅमेरे नसणे, संशयास्पद व्यक्तींची चौकशी न करणे, अलार्म सिस्टीम्स नसणे आदी यंत्रणा कमकुवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे अशा बॅँकाचा परवाना रद्द करणे व विमा कंपन्यांना अवगत करण्यासाठी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गणपती विसर्जन मार्गावर सीसीटिव्ही
प्रेरणा सभागृहात झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत सुपेकर यांनी जिल्‘ातील गुन्‘ांचा आढावा घेतांना गणेशोत्सवात उपद्रवी व्यक्तींवर कोणती व काय कारवाई करावी याच्या सूचना देऊन प्राथमिक अहवाल तयार केला. तसेच विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागू नये यासाठी जळगाव शहर, अमळनेर, चोपडा, भुसावळ, पाचोरा, रावेर व यावल आदी ठिकाणी विसर्जन मार्गावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसहभाग व पोलीस दलाच्या माध्यमातून ही व्यवस्था केली जाणार आहे.
ध्वनी प्रदूषण झाल्यास कारवाई
गणेशोत्सव व बकरी ईद हे दोन्ही सण एकाच वेळी येत आहेत, त्यामुळे पोलीस दल अलर्ट झाले आहे. या काळात ध्वनी प्रदूषण करणार्‍यावर कारवाई केली जाणार आहे. डि.जे.ला बंदी घालण्यात आली आहे. आवाजाची मर्यादा मोजण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला यंत्र पुरविले जाणार असल्याचे सुपेकर म्हणाले. बैठकीला अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नंदकुमार ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांच्यासह प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
अशी आहे गणेशोत्सवातील संभाव्य कारवाई
कलम १०७ : ७३०
कलम ११० : ३००
कलम १४४(२) : ५०० (प्रवेश बंद)
कलम ९३ : २००
हद्दपार : ६२
एमपीडीए : ५ (प्रस्तावित)
मोक्का : २ (संभाव्य प्रस्तावित)

Web Title: Proposal for cancellation of license of bank not taking care of security: Superintendent of Reserve Bank and insurance companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.