दुष्काळग्रस्तांसाठी चार हजार कोटींचा प्रस्ताव

By admin | Published: November 20, 2015 11:53 PM2015-11-20T23:53:45+5:302015-11-20T23:53:45+5:30

जळगाव- दुष्काळग्रस्तांना मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाकडे चार हजार दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैकी ९२० कोटी रुपये केंद्राने दिले आहेत. त्यातून दुष्काळी भागात चारा, दुष्काळग्रस्तांना सानुग्रह अनुदान यासंबंधी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.

Proposal of four thousand crores for drought affected | दुष्काळग्रस्तांसाठी चार हजार कोटींचा प्रस्ताव

दुष्काळग्रस्तांसाठी चार हजार कोटींचा प्रस्ताव

Next
गाव- दुष्काळग्रस्तांना मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाकडे चार हजार दोन कोटी रुपयांची मागणी केली आहे. पैकी ९२० कोटी रुपये केंद्राने दिले आहेत. त्यातून दुष्काळी भागात चारा, दुष्काळग्रस्तांना सानुग्रह अनुदान यासंबंधी उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.
जिल्ह्यात शुक्रवारी दुष्काळासंबंधी पाहणीसाठी केंद्राचे पथक आले होते. याच पथकासोबत खडसे यांनीही पाहणी केली. यासंदर्भात खडसे यांच्याशी चर्चा केली.
बोदवड, जामनेरात पाहणी
बोदवडमधील शेलवड, हलखेड, जामनेरातील मालदाभाडी येथे पाहणी केली. केंद्रीय पथकातील तज्ज्ञ होते. विहिरींची पातळी, शेतांमधील स्थिती आदींची पाहणी केली, असेही खडसे म्हणाले.
औरंगाबादेत सविस्तर चर्चा करणार
राज्यभरात केेंद्राचे पथक पाहणी करीत आहे. पाहणीनंतर राज्य व केंद्राचे अधिकारी औरंगाबाद येथे बैठकीत सविस्तर चर्चा करतील व केंद्राकडे अहवाल सादर होईल, अशी माहिती खडसे यांनी दिली.

१५ दिवसात प्रक्रिया होईल
राज्याकडूनही केंद्राला माहिती सादर केली जाईल. केंद्रीय पथक दिल्लीत पुन्हा वरिष्ठ पातळीवरील चर्चेत भाग घेईल यानंतर मदतीसंबंधी आणखी निर्णय होऊ शकतील, असेही खडसे म्हणाले. १५ दिवसात ही प्रक्रिया होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Proposal of four thousand crores for drought affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.