बजरंग बोगद्यानजीक दोन भूमिगत मार्ग ंमहापालिकेचा प्रस्ताव: रेल्वे प्रशासनाची मान्यता, पावणेचार कोटी भरावे लागणार
By admin | Published: August 2, 2016 11:07 PM2016-08-02T23:07:47+5:302016-08-02T23:07:47+5:30
जळगाव : बजरंग पुलाच्या पलीकडून गणेशकॉलनीकडे येताना व जाताना होणारी वाहनांची कोंडी टळावी म्हणून महापालिकेकडून दोन भूमिगत मार्गाचे प्रस्ताव आहेत. यासाठी रेल्वेकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने रेल्वेला अपेक्षित असलेली रकम भरण्यासाठीचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करावा असे निर्देश महापौर नितीन ला यांनी आयुक्तांना दिले आहेत. त्या संदर्भातील पत्र मंगळवारी देण्यात आले.
Next
ज गाव : बजरंग पुलाच्या पलीकडून गणेशकॉलनीकडे येताना व जाताना होणारी वाहनांची कोंडी टळावी म्हणून महापालिकेकडून दोन भूमिगत मार्गाचे प्रस्ताव आहेत. यासाठी रेल्वेकडूनही हिरवा कंदील मिळाल्याने रेल्वेला अपेक्षित असलेली रकम भरण्यासाठीचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करावा असे निर्देश महापौर नितीन ला यांनी आयुक्तांना दिले आहेत. त्या संदर्भातील पत्र मंगळवारी देण्यात आले. महापौर नितीन लढढा, आयुक्त जीवन सोनवणे व मनपातील इतर पदाधिकार्यांनी सोमवारी बजरंग बोगदा परिसरात भेट देऊन तेथील परिस्थितीची पहाणी केली. लाखो लोकांच्या रहदारीचा खडतर मार्गबजरंग बोगदा हा वाहतुकीसाठी नाही मात्र शहराकडे येण्यासाठी जवळचा व सुरक्षित म्हणून त्याचा वापर केला जात असतो. पिंप्राळा रेल्वे गेट या ठिकाणचा मार्ग पिंप्राळा, खोटेनगर, निमखेडी, मुक्ताईनगर, प्रेम नगर, भिकमचंद जैन नगर या भागातील नागरिक वाहतुकीसाठी वापरत असतात. या व्यतिरिक्त बजरंग सांडपाण्याचा बोगदा या परिसरातील लोखा नागरिक सोयीचा मार्ग म्हणून वापरतात. त्याखालून दुचाकी वाहनांची प्रचंड ये-जा सुरू असते. रिक्षा, मोठ्या वाहनांना येण्या जाण्यासाठी पिंप्राळा रेल्वे गेट हाच पर्याय आहे. दरमहा लाखो वाहनांची ये-जाएका पाहणीच्या अहवालानुसार पिंप्राळा रेल्वे गेटवरून वाहतूक होणार्या वाहनांची संख्या एक ते सव्वा लाख दरमहा आहे. हे रेल्वे गेट रेल्वे स्टेशनपासून दोन मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे हे गेट बर्याच वेळेस बंदच असते. नजीकच रेल्वे गुड्स यार्ड आहे. या यार्डवर शेकडो ट्रक दिवसभरात येत जात असतात. गेट बंद असल्यास या भागात वाहनांची मोठी कोंडी होत असल्याचे दृश्य नेहमी पहायला मिळते. रेल्वे गेटपासून रेल्वेस समांतर रोड हा गणेश कॉलनी भागाकडे जातो याच रोडवर बजरंग सांडपाण्याचा बोगदा आहे. रेल्वे गेट बंद असल्यास लहान, लहान दुचाकी चालक वळतात ते बजरंग बोगद्याकडे. या बोगद्याची निर्मिती ही सांडपाणी वाहून जाण्यासाठी रेल्वेने केली होती मात्र आता वाहनांची संख्या प्रचंड वाढल्याने त्याचा वापर वाहतुकीसाठी होतो.