लाचप्रकरणातील सरकारी वकीलाविरुध्दचा खटला रद्द
By admin | Published: January 7, 2016 09:37 PM2016-01-07T21:37:51+5:302016-01-07T21:37:51+5:30
जळगाव: जिल्हा न्यायालयाच्या आवारात सरकारी वकील संजयकुमार वाघ यांनी दोन हजार रुपयाची लाच स्विकारल्याच्या दाखल गुन्ात कारवाई चुकीची केली म्हणून न्यायालयाने गुरुवारी हा खटलाच रद्दबातल ठरविला आहे.न्यायालयात खटला चालविण्यासाठी ॲड.वाघ यांनी रफीक खान हबीब खान यांच्याकडून ८ जुलै २०१४ रोजी न्यायालय आवारात दोन हजार रुपयाची लाच स्विकारली होती, म्हणून शहर पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुध्द खटला चालविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ सप्टेबर २०१४ रोजी तत्कालीन जिल्हा व सत्र न्या.एस.बी.अग्रवाल यांच्याकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने हा प्रस्ताव नाकारला होता.त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. सदरचे दोषारोपपत्र चुकीचे आहे म्हणून ॲड.वाघ यांच्याविरुध्दचा खटला रद्दबातल करण्यात
Next
ज गाव: जिल्हा न्यायालयाच्या आवारात सरकारी वकील संजयकुमार वाघ यांनी दोन हजार रुपयाची लाच स्विकारल्याच्या दाखल गुन्ात कारवाई चुकीची केली म्हणून न्यायालयाने गुरुवारी हा खटलाच रद्दबातल ठरविला आहे.न्यायालयात खटला चालविण्यासाठी ॲड.वाघ यांनी रफीक खान हबीब खान यांच्याकडून ८ जुलै २०१४ रोजी न्यायालय आवारात दोन हजार रुपयाची लाच स्विकारली होती, म्हणून शहर पोलीस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम १९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुध्द खटला चालविण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ सप्टेबर २०१४ रोजी तत्कालीन जिल्हा व सत्र न्या.एस.बी.अग्रवाल यांच्याकडे परवानगी मागितली होती. न्यायालयाने हा प्रस्ताव नाकारला होता.त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. सदरचे दोषारोपपत्र चुकीचे आहे म्हणून ॲड.वाघ यांच्याविरुध्दचा खटला रद्दबातल करण्यात यावा असा अर्ज वाघ यांच्यावतीने देण्यात आला होता. त्यावर न्या.के.पी.नांदेडकर यांनी गुरुवारी हा खटला रद्दबातल ठरविला. ॲड.वाघ यांच्यावतीने ॲड.रवींद्र पाटील यांनी काम पाहिले.शकील शेख खून खटल्यात खुलासा सादरजळगाव: प्रजापत नगरात झालेल्या शकील शेख खून खटल्यात आरोपी हर्षल वना महाजन याच्या जामीन अर्जावर गुरुवारी सरकारपक्षाने न्यायालयात खुलासा सादर केला. शुक्रवारी त्यावर युक्तीवाद होणार आहे. सरकारतर्फे ॲड.मोहन देशपांडे, मूळ फिर्यादीतर्फे ॲड.बिपीन पाटील व आरोपीतर्फे ॲड.श्रीकांत भुसारी काम पाहत आहेत.