विद्यार्थिनींशी केलेल्या गैरवर्तनामुळे प्राध्यापकाला अटक
By admin | Published: January 14, 2016 06:15 PM2016-01-14T18:15:01+5:302016-01-14T18:48:35+5:30
विद्यार्थिनींसोबत अश्लिल वर्तन करणाऱ्या तसेच त्यांना अक्षेपार्य संदेश पाठवणाऱ्या प्राध्यापकास दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - विद्यार्थिनींसोबत अश्लिल वर्तन करणाऱ्या तसेच त्यांना अक्षेपार्य संदेश पाठवणाऱ्या प्राध्यापकास दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली विद्यापिठाअंतर्गत असलेल्या अदिति महाविद्यालयातील ही घटना आहे. अटक केलेल्या प्राध्यपाकाचे नाव प्रिंस कुमार असे आहे.
पोलीस उपायुक्त विक्रमजित सिंग यांनी दिलेल्या माहीतीप्रमाणे, विद्यार्थीनीने केलेल्या तक्रारीनुसार आरोपी प्रिंस कुमार माहाविद्यालयातील विद्यार्थिनीस परीक्षेत जास्त गुण देतो म्हणून त्यांच्या सोबत अश्लिल चाळे करत असे व मुलींच्या मोबाईल वर अक्षेपार्य अश्लिल संदेश पाठवत असे.
पोलीसांनी प्रिंस कुमार यांना विद्यार्थिनीसोबत शारीरीक गैरवर्तन केल्यामुळे अटक केली आहे. पिडीत विद्यार्थिनीने केलेल्या आरोपात असे म्हटले आहे, प्राध्यापकानी तीला योग्य ते गुण दिले नाहीत, अतिरीक्त क्लास घेण्याच्या बहाण्याने बोलवून शारीरीक शोषण केलं. त्याच प्रमाणे मोबाईल वर अश्लिल संदेश तसेच व्हिडिओ पाठवत असे. तसेच रात्री उशीरा पर्यंत फोन वर बोलून मानसिक त्रास देत असे.
कॉलेजमधील प्रिंसिपल कडे तक्रार करुन ही त्या प्राध्यपकावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. असा आरोपही पिडीत मुलीने केला आहे. आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार कलम ३५४, ३५४ क, आणि ५०७ नुसार गुन्हा नोंदवला गेला आहे.