देहविक्रीची धंदा, स्पा सेंटरवर पोलिसांची धाड, तीन भाजपा नेत्यांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 04:30 PM2022-01-09T16:30:41+5:302022-01-09T16:31:58+5:30
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र सलूजा यांनी आरोप केला की, इंदौरच्या एका स्पा, ब्युटी पार्लरमध्ये देहव्रिकीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना होती.
इंदौर - शहरातील स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीला आता वेगळं वळण लागलं आहे. येथील छापेमारीत पोलिसांनीअटक केलेल्या 18 जणांमध्ये भाजप युवा मोर्चाचे तीन नेते आहेत. पोलिसांनी या तिन्ही नेत्यांना अटक करुन तुरुंगात टाकले आहे. शनिवारी काँग्रेस या भाजपा नेत्यांचे फोटो सोशल मीडियातून शेअर केले आहेत. तसेच, या तीन नेत्यांपैकी एक आरोपी वनमंत्री विजय शहा यांचा निकटवर्तीय असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. तर, संबंधित व्यक्तींच्या पदासंबंधित चौकशी सुरू असल्याचे भाजपने म्हटले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र सलूजा यांनी आरोप केला की, इंदौरच्या एका स्पा, ब्युटी पार्लरमध्ये देहव्रिकीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी येथे धाड टाकल्यानंतर पडकण्यात आलेल्या 18 जणांपैकी 3 जण खंडवातील भाजप युवा मोर्चाचे नेत आहेत. विशेष म्हणजे खंडवाचा रहिवाशी आणि राज्याचे वनमंत्री विजय शहा यांचे तिन्ही नेते निकटवर्तीय असल्याचा आरोपही सलूजा यांनी केला आहे.
प्रदेश के इंदौर में विजय नगर के स्पा सेंटर में चल रहे सेक्स रैकेट में पकड़ाये तीन आरोपियों का कनेक्शन भाजपा से सामने आया है..
— Narendra Saluja (@NarendraSaluja) January 8, 2022
तीनो युवक वरुण यादव , विवेक नामदेव व अशोक सिंगला भाजयुमो के खालवा मंडल के पदाधिकारी और प्रदेश के वन मंत्री विजय शाह इस के बेहद करीबी है। pic.twitter.com/y4dvHxv0a8
देहविक्रेय प्रकरणात पोलिसांनी तीन भाजप नेत्यांना अटक केल्यामुळे भाजपची खरी चाल, चरित्र आणि चेहरा समोर आला आहे. त्यामुळे, वनमंत्र्यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याप्रकरणी वनमंत्री शहा यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. दरम्यान, भाजप प्रवक्ता उमेश शर्मा यांनी खंडवा जिल्ह्यातील या पोलीस कारवाईत अडकलेल्या भाजप नेत्यांसंदर्बात चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे. तसेच, महिला देहव्रिकेय प्रकरणात या तिघांचा हात असल्यास त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात येईल, असेही शर्मा यांनी म्हटले.