सुरक्षाकपातीचा असहिष्णुतेशी काडीचा संबंध नाही

By admin | Published: January 9, 2016 04:14 AM2016-01-09T04:14:42+5:302016-01-09T04:14:42+5:30

शाहरूख खान आणि आमीर खान यांच्या संरक्षणातील पोलीस ताफ्यात कपात केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच पोलिसांची दिवसभर तारांबळ उडाली.

Protector's intolerance is not linked to intolerance | सुरक्षाकपातीचा असहिष्णुतेशी काडीचा संबंध नाही

सुरक्षाकपातीचा असहिष्णुतेशी काडीचा संबंध नाही

Next

पोलिसांचा खुलासा : आमीरच्या टिष्ट्वटने बातमीवर शिक्कामोर्तब
डिप्पी वांकाणी,  मुंबई
शाहरूख खान आणि आमीर खान यांच्या संरक्षणातील पोलीस ताफ्यात कपात केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच पोलिसांची दिवसभर तारांबळ उडाली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी याचा संबंध या दोघा सुपरस्टार्सनी असहिष्णुतेबाबत केलेल्या वक्तव्यांशी जोडण्यास सुरुवात करताच मुंबई पोलिसांनी अकस्मात बचावाचा पवित्रा घेतला; आणि संरक्षण आहे तेवढेच आहे, असे खुलासेवजा टिष्ट्वट केले. पण संध्याकाळी स्वत: आमीर खानने संरक्षण ताफ्यात पोलिसांनी केलेल्या कपातीचे स्वागत करणारे टिष्ट्वट करताना ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले.
या दोघा सुपरस्टारच्या संरक्षण ताफ्यातील काही वाहने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच काढून घेण्यात आली होती, असे एका (आयपीएस) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या दोघांना पुरविलेले वैयक्तिक संरक्षण काढून घेण्यात आलेले नाही, असे ‘लोकमत’ने शुक्रवारी पहिल्या पानावर दिलेल्या वृत्तात स्पष्टपणे नमूद केले होते. त्याला या अधिकाऱ्याने दुजोरा दिला. आता पोलिसांनीही संरक्षण आहे तेवढेच असल्याचा शब्दखेळ खुलाशासाठी केला. आमीर खान म्हणाला, ‘‘माझ्यासाठी असलेल्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी कपात करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. पोलीस कर्मचारी शहराच्या सुरक्षेसाठी अधिक चांगल्या रीतीने वापरता येतील. माझे संरक्षण वाढवावे असे जेव्हा मुंबई पोलिसांना वाटेल त्या वेळी ते तसे करू शकतात. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.’’

Web Title: Protector's intolerance is not linked to intolerance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.