अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या हल्ल्याचा येवल्यात निषेध
By admin | Published: July 13, 2017 05:33 PM2017-07-13T17:33:23+5:302017-07-13T23:51:12+5:30
येवला :शिवसेनेच्या वतीने पंतप्रधानांना निवेदन
येवला :शिवसेनेच्या वतीने पंतप्रधानांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला :
काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर अतिरेक्यांनी गोळीबार केल्याने त्यात सात यात्रेकरूंचा मृत्यू झाला या सर्व घटनेचा जळजळीत निषेध करत येवला येथे शिवसेनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवावयाच्या निवेदनावर स्वताच्या रक्ताची सह्या व अंगठा देत पाकिस्तानवर व अतिरेक्यावर कारवाई करण्याचे मागणी केली आहे.
स्वताच्या रक्ताने केलेल्या सह्याचे व अंगठ्यांचे पाठवले आहे. शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी गत काळात झालेल्या हल्लीच्या पार्श्वभूमीवर केलेली वक्तव्याचाही उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या निवेदनात केला आहे.येवल्यातील शिवसैनिकानी व नागरिकांनी येथील मेन रोड वरील गणपती मंदिरापुढे आपल्या बोटांचे रक्त काढत मोदींना पाठवण-या निवेदनावर रक्ताच्या सह्या व अंगठा दिला. यावेळी शिवसेना शहरसंघटक धीरज परदेशी,प्रमोद तक्ते,आशिष अनकाईकर,रशीद शेख,राहुल लोणारी,अशोक मोहारे,सुनील सरोदे ,रु पेश घोडके, यांचेसह शिवसैनिक उपस्थित होते. (12येवलाअमरनाथ)