दलितांवरील हल्ल्याचा संघाकडून निषेध, विरोधकांचा भाजपला बदनाम करण्याचा डाव
By admin | Published: August 8, 2016 06:37 PM2016-08-08T18:37:38+5:302016-08-08T18:47:30+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं उनामध्ये झालेल्या दलितांवरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8- राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं उनामध्ये झालेल्या दलितांवरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. दलितांना होणारी मारहाण ही बेकायदेशीर आणि अमानुष असल्याची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मांडली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विरोधकांकडून भाजपला बदनाम करण्याचा डाव आखला जात असल्याची टीका केली आहे.
तसेच दलितांवरील हल्ल्यांना जबाबदार असलेल्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणीही यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आली आहे. देशातला जातीय सलोखा बिघडवणा-या ते समाजकंटक कोण आहेत, याचाही केंद्र सरकारनं शोध घ्यावा, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं म्हटलं आहे.
तर कालच विश्व हिंदू परिषदेनं गोरक्षकांकडून दलितांवर होणारे हल्ल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना इशारा दिला आहे. भाजपला या वक्तव्यांचे पडसाद 2019च्या लोकसभा निवडणुकीत असाही इशारा दिला आहे.