'व्हॅलेंटाईन डे'चा विरोध, भर रस्त्यात दिली फाशी; आग्र्यात घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 01:54 PM2022-02-14T13:54:14+5:302022-02-14T13:55:57+5:30
यावेळी या संघटनेतील काही लोकांना प्रेमी युगुलांना धमकीही दिली.
आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. प्रेमी युगूलांसाठी किंवा लग्न झालेल्या जोडप्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. जगभर आजचा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करतात, पण भारतात काही लोक या दिवसाला प्रचंड विरोध करतात. ताजे प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडले आहे.
काही हिंदुत्ववादी संघटनांनी आग्र्यात व्हॅलेंटाईन डेला फाशी दिली आहे. पण, प्रत्यक्षात ही फाशी कोणत्या व्यक्तीला नाही, तर व्हॅलेंटाईन डेच्या प्रतिकात्मक पुतळ्याला देण्यात आली आहे. भर रस्त्यात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये व्हॅलेंटाईन नाव लिहीलेल्या पुतळ्याला फाशी देताना दिसत आहे.
In UP's Agra, members of a right-wing group hang effigy of "valentine" to mark their protest against Valentine's Day celebrations. pic.twitter.com/ogRLrSFmBv
— Piyush Rai (@Benarasiyaa) February 13, 2022
यावेळी खाली उभे असलेले लोक जयश्री रामच्या घोषणा देत आहेत. एक व्यक्ती यावेळी सांगतो की, 'काल रात्री व्हॅलेंटाईन पळत सुटला होता, त्याला आम्ही पकडले. त्याला चांगला चोप दिला असता, त्याने मी भारताचा नाही, परदेशी आहे, असे सांगितले. त्याच व्हॅलेंटाईनला आम्ही आज फाशी देत आहोत.
प्रेमी युगुलांना धमकी
यावेळी या संघटनेतील काही लोकांना प्रेमी युगुलांना धमकीही दिली. उद्यानांमध्ये प्रेमी युगुल दिसल्यावर त्यांच्या पालकांना बोलावून त्यांचे लग्न लावून दिले जाईल, अशी धमकी दिली. दुसऱ्या एका संघटनेने गाढवावर बसून धिंड काढण्याची धमकी दिली. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी उद्यानांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.