आंदोलक शेतकऱ्यांना हरयाणा सीमेवर अडवले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 08:07 AM2020-11-27T08:07:38+5:302020-11-27T08:08:06+5:30

पोलिसांकडून पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर;  राहुल गांधी, अमरिंदर सिंग, केजरीवालांकडून कारवाईचा निषेध

The protesters blocked the farmers on the Haryana border | आंदोलक शेतकऱ्यांना हरयाणा सीमेवर अडवले

आंदोलक शेतकऱ्यांना हरयाणा सीमेवर अडवले

Next

चंदीगढ : केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात गुरुवारी ‘चलो दिल्ली’आंदोलनात सहभागी झालेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांना हरयाणाच्या सीमेवर अडवण्यात आले. त्यांना पाण्याच्या फवाऱ्यांना तोंड द्यावे लागले. नंतर शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभारलेले अडथळेही तोडले.शंभू सीमेवर हरयाणाचे पोलीस व ट्रॅक्टर-ट्रॉलीजमध्ये आलेले पंजाबचे शेतकरी घग्गर नदीवरील पुलावर समोरासमोर आले. हरयाणाच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबच्या बाजुला एकत्र जमलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी तेथून निघून जायला ध्वनिक्षेपकाद्वारे सांगितले. हरयाणा पोलिसांनी या सीमेवरील अमृतसर-दिल्ली महामार्ग ट्रक्स उभ्या करून बंद केला. काही शेतकऱ्यांनी बॅरिकेडस नदीतही फेकले. सुरवातीला काही आंदोलक बॅरिकेडस पायीच ओलांडताना दिसले. नंतर पोलिसांनी बॅरिकेडस हटवले व आंदोलकांना व त्यांच्या ट्रॅक्टर्सना तेथून २०० किलोमीटरवर असलेल्या दिल्लीला जाणाऱ्या रस्त्यावर जाऊ दिले. परंतु, भाजपची सत्ता असलेल्या हरयाणातून महामार्ग जात असल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी बॅरिकडेस पोलिसांनी लावले होते.

करनालमध्ये पोलीस आणि शेतकरी समोरासमोर आले होते. हरयाणा आणि उत्तर प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर दिल्ली पोलिसांनी सुरक्षा वाढवली होती. दुपारी आंदोलक शेतकऱ्यांनी सीमेवरील इतर ठिकाणांवरून हरयाणात प्रवेश केला ते दिल्लीकडे प्रवास करत होते. शंभूशिवाय पोलिसांनी खनौरी सीमा आणि कैथाल जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या आंदोलकांना अडवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. मोदी सरकारच्या कुवर्तनाच्या विरोधात शेतकरी ठामपणे उभे राहिले आहेत, असे ट्वीट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध केला. गुडगावमध्ये स्वराज इंडियाचे अध्यक्ष योगेंद्र यादव आणि आंदोलकांच्या गटाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Web Title: The protesters blocked the farmers on the Haryana border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.