अरे देवा! मोदी सरकारमधील मंत्र्याला भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी ऑफिसमध्ये कोंडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 02:23 PM2023-09-14T14:23:53+5:302023-09-14T14:35:08+5:30

केंद्र सरकारचे शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांना भाजपा कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात कोडलं होतं.

protesting bengal bjp workers lock up union minister subhash sarkar in party office | अरे देवा! मोदी सरकारमधील मंत्र्याला भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी ऑफिसमध्ये कोंडलं अन्...

अरे देवा! मोदी सरकारमधील मंत्र्याला भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी ऑफिसमध्ये कोंडलं अन्...

googlenewsNext

केंद्र सरकारचे शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष सरकार यांना भाजपा कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात कोडलं होतं. सुभाष हे 'हुकूमशाही पद्धतीने' जिल्हा युनिट चालवत असल्याचा आरोप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. काही वेळाने पोलिसांनी सुभाष यांची सुटका केली. पश्चिम बंगालच्या बांकुरा येथील या घटनेवर भाजपाचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य म्हणाले की, या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्याचवेळी तृणमूल काँग्रेसचं म्हणणं आहे की, यावरून पश्चिम बंगालमधील भाजपाची बिघडलेली स्थिती दिसून येते.

इंडिया टुडेशी संबंधित अनुपम मिश्रा यांच्या रिपोर्टनुसार, मोदी सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार दुपारी एक वाजता जिल्हा पक्ष कार्यालयात बैठक घेत होते. त्यानंतर अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून घोषणाबाजी करत सुभाष यांना कोंडून ठेवलं. जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणाबाजी सुरू असताना अनेक कर्मचारी सुभाष सरकार तुम्हाला आम्ही मानत नाही, यांना दूर हटवा अशा घोषणा देत होते.

रिपोर्टनुसार, मंत्र्यांना जवळपास अर्धा तास तिथेच कोंडून ठेवलं होतं. पोलिसांचं पथक पक्ष कार्यालयात पोहोचलं आणि सुभाष यांची अखेर सुटका केली. रिपोर्टनुसार, भाजपा कार्यकर्ता मोहित शर्मा हा त्या कार्यकर्त्यांपैकी एक आहे ज्यांनी सुभाष यांना खोलीत कोंडून बाहेरून कुलूप लावले होते. 

मोहित पुढे म्हणाले की, जे कार्यकर्ते पक्षासाठी मेहनत करतात त्यांना सुभाष महत्त्व देत नाहीत. सुभाष यांनी जिल्हा समितीत आपल्या निकटवर्तीयांची निवड केल्याचा आरोप आहे. दरम्यान, हे पाऊल उचलणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पश्चिम बंगाल भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी सांगितले. हे सर्व आरोप गैरसमजातून सुभाष यांच्यावर होत असल्याचे समिक यांचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: protesting bengal bjp workers lock up union minister subhash sarkar in party office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा