निदर्शने करणारे शेतकरी दहशतवादी आहेत; कंगना राणौत बरळली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 06:15 AM2020-09-22T06:15:09+5:302020-09-22T06:15:26+5:30
कृषी विधेयकावरून कंगना रनौतची मुक्ताफळे; याच लोकांनी केला सीएएविरोधात हिंसाचार
जालंधर : राज्यसभेत रविवारी संमत झालेल्या कृषीविषयक विधेयकांविरोधात पंजाबमध्ये निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांना अभिनेत्री कंगना रनौत हिने दहशतवादी म्हटले आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे एकाचेही नागरिकत्व गेलेले नसताना याच दहशतवाद्यांनी त्या कायद्याविरोधात हिंसाचार माजविला होता, अशी मुक्ताफळे कंगनाने उधळली आहेत.
कृषीविषयक विधेयके राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार टष्ट्वीट केले होते. कृषी विपणनाशी संबंधित विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यानंतरही कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व कायम राहणार आहे, तसेच सरकारही शेतकºयांकडून हमी भावाने कृषी उत्पादने यापुढेही खरेदी करणार आहे, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. त्यावर राणावत म्हणाली, मोदीजी, कोणी झोपले असेल तर त्याला जागे करता येते, मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितले तरी त्यांना काय फरक पडणार आहे?
एकाचेही नागरिकत्व गेलेले नसतानाही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात हिंसाचार माजविणाºया दहशतवाद्यांनी आता कृषी विधेयकाच्या विरोधात निदर्शने सुरू केली आहेत.
दलेर मेहंदी, कंगना करणार जनजागृती
च्कृषीविधेयकाच्या निमित्ताने मोदी सरकारवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधी पक्ष व शेतकºयांच्या संघटना यांना तोंड देतानाच, भाजप कृषी विधेयकांबद्दल शेतकºयांच्या मनात बसलेली भीती दूर करण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी, २५ सप्टेंबरपासून एक जागृती मोहीम हाती घेणार आहे.
च्ही विधेयके शेतकºयांच्या हिताची कशी आहेत हे समजावून सांगण्याची कामगिरी आता या मोहिमेद्वारे कंगना रनौत व गायक दलेर मेहंदी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
च्विविध राज्यांतील भाजपचे पक्षसंघटन, त्या पक्षाचे खासदार, किसान मोर्चा (भाजपचा शेतकरीविषयक विभाग) हे सर्वजण या मोहिमेत सहभागी झाले आहेत.