Wrestler Protest: आम्ही सगळी पदके परत करणार! आंदोलनाला बसलेल्या पैलवानांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 12:09 PM2023-05-04T12:09:11+5:302023-05-04T12:09:45+5:30
दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर गेल्या काही दिवसापासून पैलवानांचे भाजप खारसाद ब्रिजभूषण सिंह विरोधात आंदोलन सुरू आहे.
भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटुंनी आंदोनल सुरू केलं आहे. युनियनच्या अध्यक्षांना अटक करून राजीनामा द्यावा, या मागणीवर ठाम असलेल्या कुस्तीपटूंनी आता मोठी घोषणा केली आहे. सर्व पैलवानांनी पदक परत करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनात सहभागी असलेली महिला कुस्तीपटू विनेश फोगट यांनी गुरुवारी सांगितले की, हे सर्व खेळाडू त्यांची पदके परत करतील.
दिल्ली पोलिसांनी संघाचे अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असतानाच धरणावर बसलेल्या कुस्तीपटूंच्या वतीने ही घोषणा करण्यात आली आहे. आंदोलक पैलवानांचे म्हणणे आहे की, जेव्हा पोलिसांनी अध्यक्षाला अटक करून तुरुंगात टाकले तेव्हाच त्यांचे आंदोलन संपेल.
Video: धक्कादायक... महिला आयोगाच्या अध्यक्षांना पोलिसांनी हाता-पायाला धरुन उचललं
विनेश फोगट म्हणाल्या की, आपले करिअर पणाला लागले आहे. यावेळी आंदोलनात सहभागी कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, या प्रकरणात अटक होऊ शकते, आम्ही निघू, आमचे लक्ष्य फक्त ब्रिजभूषण शरण सिंह आहे.
आंदोलनात असलेल्या पैलवानांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. आम्ही अशा वागणुकीची अपेक्षा करत नाही. देशात महिलांना अशी वागणूक दिली जात असल्याची परिस्थिती आहे. असेच करायचे असेल तर पदक परत करू, असंही त्या म्हणाल्या.
काल आंदोलनाचा आजचा बारावा दिवस होता विविध राजकीय पक्ष खेळाडूंना पाठिंबा दर्शवले. आंदोलक महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी देखील मोर्चा काढला. पण, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने बजरंग पुनियाने संतप्त प्रतिक्रिया दिली. भारतीय ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख पीटी उषा यांनीही आज आंदोलकांची भेट घेऊन बाजू समजून घेतली. त्यानंतर, मध्यरात्री उशिरा दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल याही आंदोलनस्थळी पोहोचल्या होत्या. त्यावेळी, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
ऑलिपिंक खेळाडूंचा प्रश्न आता कुठे तरी मिटेल असे वाटत असताना दिल्ली पोलिसांनी मध्यरात्री जंतर मंतरवर 'दंगल' घडवून आणल्याचा आरोप होतोय. पोलिसांनी आंदोलककर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. दिल्ली पोलिसांनी सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. पण आंदोलक त्यांच्या राजीनाम्यावर ठाम असून अटकेची मागणी करत आहेत. पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांची पोलिसांनी धरपकड केल्यानंतर बजरंग पुनियाने ट्विटच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. तर, दुसरीकडे दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.