मेटारोल इस्पात अन् जालना एक्सप्लोरर्स ग्रुपची अभिमानास्पद कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 04:15 AM2019-01-31T04:15:26+5:302019-01-31T04:15:40+5:30

स्टॅच्यू ऑफ युनिटीसमोर १८२ फुटांचा तिरंगा!

The proud performance of Metarol Steel and Jalna Explorers Group | मेटारोल इस्पात अन् जालना एक्सप्लोरर्स ग्रुपची अभिमानास्पद कामगिरी

मेटारोल इस्पात अन् जालना एक्सप्लोरर्स ग्रुपची अभिमानास्पद कामगिरी

googlenewsNext

जालना : सर्वात मोठा राष्ट्रध्वज सरदारांच्या पुतळ्यासमोर उभारण्याचे स्वप्न जालना एक्सप्लोरर्स ग्रुपने पाहिले व ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांना मोलाचे पाठबळ मेटारोल इस्पातने दिले. खारपुडीसारख्या छोट्या खेड्यातील टेलर परमेश्वर उरटवाड आणि ध्वजावरील अशोक चक्राचे पेंटींग करणारे अमित रोकडे यांच्या मदतीने ते स्वप्न साकारही केले. प्रजासत्ताकदिनी गुजरात केवडिया येथे नर्मदेच्या तिरावर हा १८२ फुटांचा राष्ट्रध्वज फडकावून सलामी देण्यात आली.

मेटारोल इस्पातचे संचालक डी. बी. सोनी यांनी जालना एक्सप्लोरर्स ग्रुपच्या राष्ट्रध्वज निर्मितीच्या मोहिमेला सहकार्य केले. जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचे प्रायोजकत्व मेटारोलने अभिमानाने स्वीकारले. या मोहिमेची लिम्का बुक आॅफ रेकार्ड आणि इंडिया बुक

आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या कार्यक्रमाला सरदार वल्लभभाई राष्ट्रीय एकता ट्रस्टचे सचिव (आयएएस) आय. के. पटेल , जालना एक्सप्लोरर्स ग्रुपचे पंकज खरटमल, विनोद सुरडकर, यांच्यासह मेटारोलचे डीलर्स उपस्थित होते. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: The proud performance of Metarol Steel and Jalna Explorers Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.