हाणामारीचे व्हिडीओ पुरावे द्या!

By admin | Published: February 23, 2017 01:32 AM2017-02-23T01:32:43+5:302017-02-23T01:32:43+5:30

मुख्यमंत्री एडापड्डी के. पलाणीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुक सरकारवर गेल्या शनिवारी तमिळनाडू विधानसभेत

Provide Video Proof of Action | हाणामारीचे व्हिडीओ पुरावे द्या!

हाणामारीचे व्हिडीओ पुरावे द्या!

Next

चेन्नई : मुख्यमंत्री एडापड्डी के. पलाणीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुक सरकारवर गेल्या शनिवारी तमिळनाडू विधानसभेत मंजूर झालेल्या विश्वासदर्शक ठरावास स्थगिती देण्यास मद्रास उच्च न्यायालयाने नकार दिला व हा ठराव विधानसभेत हाणीमारीच्या वातावरणात बेकायदा संमत करण्यात आला हा आरोप सिद्ध करण्यासाठी सभागृहातील कामकाजाचे व्हिडिओ चित्रण सादर करावे असे द्रमुकला सांगितले.
विधानसभेतील द्रमुकचे विरोधी पक्षनेते एम. के. स्टॅलिन व ‘अ‍ॅडव्होकेट््स फोरम फॉर सोशल जस्टिस’ यांनी हा विश्वासदर्शक ठराव रद्द करून घेण्यासाठी याचिका केल्या आहेत. याचिका लगेच सुनावणीस घेण्याची विनंती स्टॅलिन यांचे वकील आर. षण्मुगसुंदरम गेले दोन दिवस करीत होते. अखेर मुख्य न्यायाधीश न्या. एच. जी. गणेश व न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठापुढे या दोन्ही याचिका बुधवारी घेण्यात आल्या.

Web Title: Provide Video Proof of Action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.