संरक्षण क्षेत्रासाठी २.७४ लाख कोटींची तरतूद
By admin | Published: February 1, 2017 02:07 PM2017-02-01T14:07:58+5:302017-02-01T14:26:20+5:30
केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संरक्षण क्षेत्रासाठी २.७४ लाख कोटींची तरतूद केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - संपूर्ण देशाचे लक्ष लागलेला केंद्रीय अर्थसंकल्प अखेर आज सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात अनेक योजनांची घोषणा केली. यंदा संरक्षण क्षेत्रासाठी त्यांनी २.७४ लाख कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली असून त्यातून निवृत्ती वेतनावर करण्यात येणारा खर्च वगळण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने संरक्षण क्षेत्रासाठी मिळत असलेल्या तरतुदीमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली होती. दरम्यान संरक्षण क्षेत्रावर अपेक्षेप्रमाणे खर्च होत नसल्याचा तक्रारीचा सूर अनेकांनी आळवला आहे.