PSLV-C57/Aditya-L1 Mission : आता लक्ष्य 'सूर्य'! आदित्य-L1 २ सप्टेंबरला लॉन्च होणार; ISROची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 03:47 PM2023-08-28T15:47:13+5:302023-08-28T15:49:06+5:30
चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आणखी एक मोहीम सुरू केली आहे.
नवी दिल्ली : चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आणखी एक मोहीम सुरू केली आहे. आता इस्रो सूर्याकडे जाण्याच्या तयारीत आहे. इस्रो २ सप्टेंबर रोजी सूर्य मोहीम लॉन्चिंग करणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती इस्रोने दिली असून आदित्य-L1 चे प्रक्षेपण २ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा येथून ११.५० वाजता होणार आहे. खरं तर सूर्याचा अभ्यास करणारी ही पहिली भारतीय मोहीम असणार आहे.
🚀PSLV-C57/🛰️Aditya-L1 Mission:
— ISRO (@isro) August 28, 2023
The launch of Aditya-L1,
the first space-based Indian observatory to study the Sun ☀️, is scheduled for
🗓️September 2, 2023, at
🕛11:50 Hrs. IST from Sriharikota.
Citizens are invited to witness the launch from the Launch View Gallery at… pic.twitter.com/bjhM5mZNrx
दरम्यान, आदित्य एल १ मिशन हे सूर्याचे तापमान, सूर्य किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम, विशेषतः ओझोनचा थर, अवकाशातील हवामानाची गतिशीलता यांचा अभ्यास करणार आहे. बंगळुरू येथील इस्रोच्या मुख्यालयातून याचे प्रक्षेपण केले जाईल. ISRO दोन सप्टेंबर रोजी सकाळी ११.५० वाजता श्रीहरिकोटा येथून सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित भारतीय वेधशाळा आदित्य-L1 लॉन्च करेल.
PSLV-C57/Aditya-L1 Mission: The launch of Aditya-L1, the first space-based Indian observatory to study the Sun, is scheduled for September 2, 2023, at 11:50 Hrs. IST from Sriharikota: ISRO pic.twitter.com/jDukZFWDYn
— ANI (@ANI) August 28, 2023
तसेच इस्रोकडून नागरिकांना त्यांच्या संकेतस्थळावर नोंदणी करून श्रीहरीकोटा येथील लॉन्च व्ह्यू गॅलरीतून प्रक्षेपणाचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.
भारत प्रथमच... पण याआधी सूर्य मोहिमेवर कोण गेले?
भारत प्रथमच सूर्यावर संशोधन करणार आहे. पण, आतापर्यंत एकूण २२ मोहिमा सूर्याकडे पाठवण्यात आल्या आहेत. ज्या देशांनी या मोहिमा पूर्ण केल्या आहेत त्यात अमेरिका, जर्मनी, युरोपियन स्पेस एजन्सीचा समावेश आहे. नासाने सर्वाधिक मिशन केले आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने १९९४ मध्ये नासाच्या सहकार्याने पहिली सूर्य मोहीम पाठवली. एकट्या नासाने सूर्यावर १४ मोहिमा पाठवल्या आहेत. नासाच्या पार्कर सोलर प्रोब नावाच्या व्यक्तीने सूर्याभोवती २६ वेळा प्रदक्षिणा घातली आहे. NASA ने २००१ मध्ये जेनेसिस मिशन लाँच केले. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना सौर वाऱ्याचे नमुने घेणे हा त्याचा उद्देश होता.