पीएसएलव्ही....प्रक्षेपण

By Admin | Published: July 11, 2015 12:15 AM2015-07-11T00:15:28+5:302015-07-11T00:15:28+5:30

पीएसएलव्ही- प्रक्षेपण....१० जुलै २०१५

PSLV .... launch | पीएसएलव्ही....प्रक्षेपण

पीएसएलव्ही....प्रक्षेपण

googlenewsNext
एसएलव्ही- प्रक्षेपण....१० जुलै २०१५

पाच ब्रिटीश उपग्रहांसह
पीएसएलव्ही-सी २८ची अंतराळ झेप
श्रीहरीकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) संदेशवहनाच्या नव्या पर्वात पदार्पण करीत शुक्रवारी रात्री श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही- सी २८ या उपग्रह प्रक्षेपण वाहनातून १४४० किलो वजनाचे पाच ब्रिटिश उपग्रह अंतराळात यशस्वीपणे प्रक्षेपित केली. इस्त्रोची ही आजवरची सर्वात अवजड व्यावसायिक अंतराळ मोहीम आहे.
रात्रीचा अंधार भेदत पीएसएव्ही-सी-२८ हे उपग्रह प्रक्षेपण वाहन सतीश धवन अंतराळ केंद्रावरून शुक्रवारी रात्री ९.५८ वाजता अंतराळात झेपावले. त्यानंतर २० मिनिटांनी हे पाचही उपग्रह सौर-समकालीन कक्षेत स्थिर करण्यात आले. बुधवारी सकाळी ७.२८ वाजता उलटगणतीला प्रारंभ झाला.
ही अत्यंत यशस्वी मोहीम ठरली, अशा शब्दात इस्त्रोचे चेअरमन किरण कुमार यांनी आनंद व्यक्त केला. नियंत्रण कक्षात उपस्थित असलेल्या शास्त्रज्ञांनीही यावेळी एकमेकांचे अभिनंदन करीत जल्लोष केला. या मोहीमचे आयुर्मान ७ वर्षे आहे. या पाच उपग्रहांचे वजन १४४० किलो असून इस्त्रोची ही आजवरी सर्वात अवजड व्यावसायिक अंतराळ मोहीम आहे.
पीएसएलव्हीची ३० वी मोहीम
पीएसएलव्हीच्या ३० व्या मोहिमेने वजनाच्या तुलनेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. डीएमसी ३ हे प्रत्येकी ४४७ किलो वजनाचे तीन उपग्रह ६४७ कि.मी. अंतरावरील सौर कक्षेत सोडले असून त्यांचा वापर पृथ्वीवरील निरीक्षणांसाठी केला जाणार आहे. उर्वरित दोन उपग्रह पूरक म्हणून काम करतील. युके- सीबीएनटी-१ हा सूक्ष्म उपग्रह सर्व्हे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेडने(एसएसटीएल)तयार केला आहे. डी-ऑर्बिटसेल या अन्य उपग्रहाची निर्मिती सर्व्हे स्पेस सेंटरने केली आहे. पाच उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी एसएसटीएल, ब्रिटन आणि अँट्रिक्स कापार्ेरेशन लिमिटेडने करार केला आहे.
----------------------------
कोणत्याही लक्ष्याची प्रतिमा शक्य
ऑप्टिकल अर्थ ऑबर्झव्हेशन या यंत्रणेनुसार या उपग्रहाला पृथ्वीच्या पृष्ठभागावरील लक्ष्याची अचूक प्रतिमा मिळविणे शक्य होणार आहे. दररोज ही छायाचित्रे घेणे शक्य होईल. पृथ्वीवरील संसाधनांचे सर्वेक्षण, पर्यावरण, नागरी पायाभूत यंत्रणांसंबंधी माहिती तसेच आपत्तीवर निगराणी ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य हे उपग्रह पार पाडतील. या मिशनचे आयुष्य ७ वर्षांचे राहील. यापूर्वी इस्रोने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळयान(मार्स ऑर्बिटर) तर २२ ऑक्टोबर २००८ रोजी चांद्रयान-१ चे यशस्वी प्रक्षेपण केले होते. त्यात पीएसएलव्ही-एक्सएल या प्रक्षेपकाने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Web Title: PSLV .... launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.