पं. मालवीय यांना मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान

By Admin | Published: March 30, 2015 12:07 PM2015-03-30T12:07:34+5:302015-03-30T14:56:36+5:30

हिंदू महासभेचे नेते व बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांना आज मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Pt Bharat Ratna posthumously awarded to Malviya | पं. मालवीय यांना मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान

पं. मालवीय यांना मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३० - हिंदू महासभेचे नेते व बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांना आज मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या सोहळ्यात मालवीय यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह केंद्रीय मंत्री  उपस्थित होते. पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासोबत माजी पंतप्रधान अटलबिहापरी वाजपेयी यांनाही 'भारतरत्न' पुरस्कार जाहीर झाला होता. राष्ट्रपतींनी नुकताच हा पुरस्कार वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला.
आज सकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात पद्म पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, प्रकाशसिंह बादल वस्वामी राम भद्राचार्य यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तर पत्रकार रजत शर्मा यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गीतकार प्रसून जोशी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 

Web Title: Pt Bharat Ratna posthumously awarded to Malviya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.