माझ्या वाढत्या प्रशंसेमुळे पं. रविशंकर नाराज होते
By admin | Published: September 2, 2014 02:05 AM2014-09-02T02:05:05+5:302014-09-02T10:39:59+5:30
भारतीय शास्त्रीय संगीतातील एक घराणो कीर्तीच्या शिखरावर पोहोचले मात्र एकेकाळच्या नामवंत सतारवादक अन्नापूर्णादेवी यांनी जवळपास 60 वर्षे प्रसिद्धीपासून दूर राहाणो पसंत केले
Next
कोलकाता : भारतीय शास्त्रीय संगीतातील एक घराणो कीर्तीच्या शिखरावर पोहोचले मात्र एकेकाळच्या नामवंत सतारवादक अन्नापूर्णादेवी यांनी जवळपास 60 वर्षे प्रसिद्धीपासून दूर राहाणो पसंत केले. सतारवादक पं. रविशंकर यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी 88 वर्षीय अन्नपूर्णादेवी यांची ही कहाणी आहे. मला तुलनेने दिली जाणारी अधिक प्रसिद्धी व प्रशंसेने रविशंकर नाराज होते, त्याचा परिणाम वैवाहिक जीवनावर होऊ नये म्हणून मी प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा मार्ग निवडल्याचे त्या एका मुलाखतीत म्हणाल्या.
अन्नपूर्णादेवी हे नाव नव्या पिढीला परिचित नाही. फार कमी सुदैवी लोकांना त्यांच्या गायनाचा आनंद घेता आला. साठ वर्षापूर्वीच ‘सूरबहार’ अन्नापूर्णादेवींचे गायन सार्वजनिकरीत्या हरपले. गायन का सोडले याबाबतचा खुलासा दीर्घ कालखंडानंतर करताना त्यांनी पं. रविशंकर यांच्यासोबतचे लग्न मोडू नये यासाठीच हा त्याग केल्याचा खुलासा केला आहे. (वृत्तसंस्था)
पण नियतीला ते मान्य नव्हते..
दैवीदेण लाभलेल्या या दोन कलावंतांचे विवाहबंधन मात्र फार काळ टिकले नाही. हा नियतीचा क्रूर खेळ म्हणावा. अन्नपूर्णादेवींनी मोठा त्याग करूनही ते शक्य झाले नाही. माङो वडील उस्ताद अल्लाउद्दीन खान यांनीच मला संगीत शिकविले होते. त्यांचे मन दुखविले जावे असे मला वाटत नव्हते. ते पापभिरू होते. एकुलत्या लेकीचे लगA मोडले जाणो त्यांना बघवणारे नव्हते, असे त्या म्हणाल्या.
च्मला वैवाहिक जीवन किंवा व्यावसायिक प्रतिष्ठा यापैकी एकाची निवड करायची होती. मी विवाहाला अधिक पसंती दिली. मला नाव आणि प्रसिद्धी मिळविण्याऐवजी लगAबंधन महत्त्वाचे वाटले. माझा स्वभाव आत्मकेंद्री म्हणण्यापेक्षा कौटुंबिक अधिक होता, असे अन्नपूर्णादेवी यांनी सांगितले.
आयुष्याला कलाटणी
1941 मध्ये पं. रविशंकर आणि अन्नपूर्णादेवी यांचा हिंदू पद्धतीने विवाह झाला. दुस:या वर्षी त्यांना मुलगा झाला. सुभेंद्र शंकर ऊर्फ शुभो हे त्याचे नाव. पण त्याचा अमेरिकेतील एका धर्मदाय रुग्णालयात अकाली मृत्यू झाला. पंडितजींनी त्याच्याकडे लक्ष दिले नव्हते. त्यांच्या आयुष्यात आधीच एक महिला होती. सुकन्या आणि अनुष्का या दोन मुलींसह माङो कुटुंब आहे, असे ते म्हणाले होते. त्यांनी शुभोला आपले कुटुंबीय मानले नाही. रविशंकर यांनी माङो वडील अल्लाउद्दीन यांची मात्र सवरेपरी सेवा केली होती, असेही त्यांनी सांगितले.