पं.स.सभापतींच्या पतीला घरात घुसून मारहाण

By admin | Published: June 12, 2016 10:34 PM2016-06-12T22:34:26+5:302016-06-12T22:34:26+5:30

जळगाव: गावातील अतिसाराची लागण व त्यातून झालेल्या दोन महिलांच्या मृत्यूस जबाबदार धरुन संतप्त गावकर्‍यांनी आव्हाणे ता.जळगाव येथे शनिवारी रात्री दहा वाजता जळगाव पंचायत समितीच्या सभापती हिराबाई मोरे यांचे पती सुनील मोरे व पुतण्या किरण गोपाळ मोरे यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नऊ जणांविरुध्द ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एका जणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Pt Sabbapati's husband entered the house and beat him | पं.स.सभापतींच्या पतीला घरात घुसून मारहाण

पं.स.सभापतींच्या पतीला घरात घुसून मारहाण

Next
गाव: गावातील अतिसाराची लागण व त्यातून झालेल्या दोन महिलांच्या मृत्यूस जबाबदार धरुन संतप्त गावकर्‍यांनी आव्हाणे ता.जळगाव येथे शनिवारी रात्री दहा वाजता जळगाव पंचायत समितीच्या सभापती हिराबाई मोरे यांचे पती सुनील मोरे व पुतण्या किरण गोपाळ मोरे यांना घरात घुसून मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नऊ जणांविरुध्द ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एका जणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.
वाळूची अवैध वाहतुक करणार्‍या डंपरने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने आव्हाणे येथे रात्री साडे नऊ वाजता वाद झाला होता. या वादात पाचशेच्यावर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. त्याच वेळी गावकर्‍यांनी सरपंच वत्सलाबाई मोरे व पंचायत समितीच्या सभापती हिराबाई मोरे यांचे पती सुनील मोरे यांना अतिसाराबाबत जाब विचारत या घटनेला सरपंच व सभापतीच जबाबदार असल्याचा आरोप करुन त्यांच्या घरावर हल्ला चढविला. दरम्यान, डंपरचा हा वाद हा निमित्त ठरला. डंपर जळगावचा असला तरी प्रत्यक्षात त्याचा चालक गावातीलच होता व हा डंपरही रिकामाच होता, असे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, हा डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दुचाकी व रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले आहे.
रात्री पोलिसांकडून धरपकड
या घटनेत दिलीप रामा पाटील, दीपक जानकीराम पाटील, भूषण हिलाल पाटील, भूषण धर्मा पाटील, ज्ञानेश्वर पंढरीनाथ पाटील, लहू नामदेव पाटील, बापू नामदेव पाटील, पंढरीनाथ नामदेव पाटील व नारायण नामदेव पाटील (सर्व रा.आव्हाणे) यांच्याविरुध्द दंगल व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रभर संशयितांची धरपकड करुन भुषण धर्मा पाटील वगळता सर्व आठ जणांना अटक केली. भूषण हा जिल्हा रुग्णालयात दाखल आहे.
गावात तणावपूर्ण शांतता
गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे समजताच पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, उपनिरीक्षक वंदना सोनुने, गुन्हे शोध पथकाचे राजेंद्र बोरसे, जितेंद्र पाटील, गिरीश पाटील, प्रफुल्ल धांडे यांनी घटनास्थळ गाठले. वातावरण जास्तच चिघडल्याने पाहून निरीक्षक पाटील यांनी मुख्यालयातील आरसीपीचे एक प्लाटून मागवून घेतले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले. आता गावात तणावपूर्ण शांतता आहे, मात्र बंदोबस्त कायम आहे.

Web Title: Pt Sabbapati's husband entered the house and beat him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.