पब्जीच्या व्यसनामुळे तो पोहोचला प. बंगालमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 04:42 AM2019-09-29T04:42:39+5:302019-09-29T04:43:04+5:30
पब्जी खेळाचे व्यसन जडलेला एक १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुण आपल्या नवी मुंबईतील नेरूळ येथील घरून १६ सप्टेंबर रोजी पळून गेला होता.
नवी दिल्ली : पब्जी खेळाचे व्यसन जडलेला एक १६ वर्षीय महाविद्यालयीन तरुण आपल्या नवी मुंबईतील नेरूळ येथील घरून १६ सप्टेंबर रोजी पळून गेला होता. तो आता पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे सापडला आहे.
आयुष चुडाजी असे या मुलाचे नाव आहे. आॅक्टोबरमध्ये राष्ट्रीय पब्जी अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो कोलकत्याला गेला असल्याचे सांगितले जात आहे. एपीआय स्वप्नील इज्जपवार यांनी सांगितले की, कोलकत्यातील एंटाली पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याला शीलदाह येथील एनआरएस मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो अस्वस्थ असल्याचे जाणवल्यानंतर त्या पोलिसाने त्याला ‘तू हरवला आहेस का’, अशी विचारणा केली. त्यावर तो रडायला लागला. घरून पळून आलो असल्याचे त्याने सांगितले.