लोकशाहीत टीका, सूचनांंचे स्थान महत्त्वाचे

By admin | Published: May 29, 2017 01:24 AM2017-05-29T01:24:11+5:302017-05-29T01:24:11+5:30

आपल्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त आमच्या सरकारची कामे, उणिवा समजून घेण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांनी

Public criticism, location of suggestions important | लोकशाहीत टीका, सूचनांंचे स्थान महत्त्वाचे

लोकशाहीत टीका, सूचनांंचे स्थान महत्त्वाचे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आपल्या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून, त्यानिमित्त आमच्या सरकारची कामे, उणिवा समजून घेण्यासाठी विविध प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या जनमत चाचण्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून रविवारी आभार मानले.
लोकशाहीत टीका आणि सूचना यांना कायमच महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचा आदर करायलाच हवा, असे स्पष्ट करून पंतप्रधान म्हणाले की, सरकार हे जनतेच्या मतांवर निवडून आलेले असते. त्यामुळे सरकारने जनतेचे म्हणजे ऐकून घ्यायलाच हवे. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यायलाच हवीत. विधायक टीकेमुळे तर लोकशाहीला बळच मिळते, असे सांगून सरकारवर टीका करणाऱ्यांचे तसेच विविध सूचना करणाऱ्यांचे आपण आभार मानू इच्छितो. जनमत चाचण्यांमुळे सरकारचे काम कशा प्रकारे सुरू आहे, याचा अंदाज येणेही सोपे झाले आहे.
रमजानचा पवित्र महिना सुरू झाला असून, त्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले की, धर्म, जात, संस्कृती परंपरा आणि विचार वेगळे असले तरी त्यातून ऐक्य, शांतता व सद्भावना यांचेच दर्शन घडले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधानांनी आपल्या भाषणात त्यांना आदरांजली वाहिली. सावरकर आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी जे लिखाण केले, त्यातून स्वातंत्र्यलढ्याला प्रोत्साहन मिळाले होते, असेही ते म्हणाले.
त्यांनी तुरुंगातून सावरकर यांनी लिहिलेल्या कवितांचा मुद्दाम उल्लेख केला. मोदी यांनी पर्यावरण दिवसानिमित्त वृक्षारोपणात सर्वांनी योगदान द्यावे, पावसाळ्यात प्रत्येकाने वृक्षारोपण करावे, असे ते म्हणाले. रजेच्या काळात प्रत्येकाने नेहमीपेक्षा काही तरी वेगळे करायला हवे, असे आवाहन पंतप्रधानांनी याआधी केले होते. आपल्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अफरोज यांचे अभिनंदन

मुंबईच्या वर्सोवा येथील समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करणारे अफरोज शहा आणि तेथील रहिवासी संघटना यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात कौतुक करतानाच स्वच्छ भारत मोहिमेला जनआंदोलनाचे रूप येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.


च्वर्सोवा येथे शहा व तेथील रहिवाशांनी यशस्वीपणे सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेची दखल घेतानाच मोदी यांनी अन्य राज्यांत ही मोहीम राबविण्यासाठी स्पर्धा सुरू होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Web Title: Public criticism, location of suggestions important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.