रस्ते कामांसाठी जनहित याचिका

By admin | Published: July 16, 2016 11:47 PM2016-07-16T23:47:13+5:302016-07-16T23:47:13+5:30

जळगाव : आसोदा - भादली रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने मनपा विरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशारा आसोदा व भादली येथील प्रवासी वर्गाकडून देण्यात आला आहे. या संदर्भात शनिवारी मनपा प्रशासनास निवेदनही देण्यात आले.

Public interest litigation for road work | रस्ते कामांसाठी जनहित याचिका

रस्ते कामांसाठी जनहित याचिका

Next
गाव : आसोदा - भादली रेल्वे गेट पर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने मनपा विरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशारा आसोदा व भादली येथील प्रवासी वर्गाकडून देण्यात आला आहे. या संदर्भात शनिवारी मनपा प्रशासनास निवेदनही देण्यात आले.
महापालिका हद्दीतील वाल्मीक नगर, मोहन टॉकीज परिसर पुढे आसोदा रेल्वे गेटकडील रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. सततच्या पावसामुळे कच्च्या रस्त्यात चिखलाचे साम्राज्य असते. बर्‍याच वेळेस यामुळे वाहने घसरतात व अपघात होतो. याच रस्त्यावर मागील वर्षी दोन व्यक्तींचे बळी गेले होते. या घटनेस वर्ष उलटूनही रस्त्याच्या परिस्थितीकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे यांना याप्रश्नी नागरिकांनी निवेदन दिले आहे. मात्र त्यांनीही हा विषय गांभीर्याने न घेतल्याने आता याप्रश्नी दिवाळीपर्यंत रस्त्याच्या कामास सुरुवात न झाल्यास महापालिके विरोधात प्रवासी वर्ग जनहित याचिका दाखल करेल असा इशारा देण्यात आला आहे. आसोदा व भादली येथील नागरिकांच्या स्वाक्षर्‍यांचे निवेदन शनिवारी महापालिका प्रशासनास देण्यात आले.

Web Title: Public interest litigation for road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.