जनमानस

By Admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:25+5:302015-02-18T00:13:25+5:30

कार्निव्हल हवाच का?

Public opinion | जनमानस

जनमानस

googlenewsNext
र्निव्हल हवाच का?
कार्निव्हल सारखे गोव्याच्या संस्कृतीशी सूतरामही संबंध नसलेले कार्यक्रम पर्यटनाच्या नावाखाली सरकारने राबवू नयेत अशी मागणी ऐरणीावर आलेली आहे. कार्निव्हलचा ख्रिस्ती धमार्शी वा त्यातील परंपरांशी काहीच संबंध नाही असेही चर्च संस्थेने जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या वाचकांच्या मानसाचा घेतलेला हा धांदोळा

काय लाभ?
कार्निव्हलद्वारे आपल्याला काय साध्य करायचे आहे तेच मला कळत नाही. पांच शहरात या उत्सवाचे आयोजन करताना सरकारने किमान एक कोटी रुपये उधळले असतील. त्यांची भरपाई करायला कुठले पर्यटक येथे येणार आहेत? आधीच आपला पर्यटन हंगाम तोट्यात गेल्याची चर्चा आहे. असा परिस्थितीत अनाठायी खर्च करणे योग्य नव्हे.
संजय दाभोळकर, कळंगूट

इंत्रूज साजरे करुया
कार्निव्हल हा ब्राझीलमध्ये जसा चालतो तसा गोव्यात करणे आपल्याला शक्य नाही. अंगप्रत्यंगांचे हिडीस दर्शन घडवत मुलींना नाचवणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. सरकारने अशा प्रकारच्या उत्सवाच्या आयोजनात पडू नये. त्याने काहीही साध्य होणार नाही. पैसे मात्र वाया जातील. त्यापेक्षा इंत्रूज साजरे करावे, परंपरेला कल्पकतेची जोड द्यावी.
सुषमा फळारी, म्हापसा

पर्यटनास पोषक
कार्निव्हल आपला उत्सव नाही हे मान्य. पण गोवेकरांच्या दृष्टीने विचार केल्यास नवरात्रीत गर्बा खेळणे वा दांडिया खेळणे हे तरी आपले उत्सव कुठे आहेत? तरिही आपली तरुणाई दांडिया खेळतेच ना? भिबत्सपणा वा शरीरप्रदर्शन या विषयांवरून कार्निव्हलला विरोध होणे मी समजू शकतो. आता तसे होत नाही. मग पर्यटनाला पोषक असलेले असे मनोरंजनाचे उत्सव आयोजित करण्यास हरकत कशाला?
ेॅसुदेश तेंडुलकर, फोंडा.

ही तर दिवाळखोरी.
केवळ पर्यटन हवे म्हणून आपण काहीह करायचे कां? भारतीय लोककलांचा महाउत्सव आपण आयोजित करू शकत नाही का? तो केल्यास पर्यटक येणार नाही असा का आपला समज आहे? आपल्या पर्यटनाची दिशा चुकते आहे आणि याची कारणे शासकांच्या बौद्धिक दिवाळखोरीत सामावलेली आहेत.
सुरज कोलवाळकर, उसगाव

Web Title: Public opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.