राजांगण पुस्तकाचे प्रकाशन
By admin | Published: August 16, 2015 11:44 PM2015-08-16T23:44:22+5:302015-08-16T23:44:22+5:30
पणजी: सर्वसामान्य माणसांच्या सहज लक्षात न येणार्या गोष्टी या पुस्तकात मांडलेल्या आहेत. लेखकाने स्वत:ची ठाम मुद्रा उमटविण्याचा या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे असे प्रतिपादन डॉ. स्नेहा म्हांबरे यांनी केले.
Next
प जी: सर्वसामान्य माणसांच्या सहज लक्षात न येणार्या गोष्टी या पुस्तकात मांडलेल्या आहेत. लेखकाने स्वत:ची ठाम मुद्रा उमटविण्याचा या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे असे प्रतिपादन डॉ. स्नेहा म्हांबरे यांनी केले.बिल्वदल साखळी आणि राज प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक राजेंद्र साखरदांडे यांच्या ‘ राजांगण ‘ या पुस्तकाच्या रविवारी झालेल्या प्रकाशन सोहळयावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर डॉ. सोमनाथ कोमरपंत, संस्थेचे उपाध्यक्ष म.कृ पाटील व अध्यक्ष सागर जावडेकर उपस्थित होते.म्हांबरे म्हणाल्या की लेखकाला आलेल्या अनुभवातून परीपक्व असे लेखन वाचकांना या पुस्तकातून अनुभवायला मिळते. समाजातील अनुभव शब्दब्ध केलेला एक हळवा साहित्यीक या पुस्तकातून वाचकांकडे पोहचतो. त्यांच्या कथेतून सूचकतेची जाणीव होते.