‘सबका साथ...’चे प्रकाशन

By admin | Published: April 18, 2017 12:44 AM2017-04-18T00:44:20+5:302017-04-18T00:44:20+5:30

‘सबका साथ, सबका विकास’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच दिल्लीत झाले.

Publication of 'Sabka Ke ...' | ‘सबका साथ...’चे प्रकाशन

‘सबका साथ...’चे प्रकाशन

Next

नवी दिल्ली : ‘सबका साथ, सबका विकास’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडक भाषणांचा संग्रह असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच दिल्लीत झाले. या पुस्तकात पंतप्रधानांच्या २८ भाषणांचा आणि १४ ‘मन की बात’च्या संवादांचा मराठीत अनुवाद केला आहे. पुण्याच्या अमेय प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध केले असून, आयबीएन-लोकमतचे पत्रकार अजय कौटिकवार आणि अमित मोडक यांनी या पुस्तकाचे संपादन आणि अनुवाद केला आहे.
संसदेतल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात झालेल्या एका खास कार्यक्रमात हा प्रकाशन सोहळा पार पडला. पुस्तके, चर्चा, परिसंवाद यांची महाराष्ट्रात मोठी परंपरा असून, असे उपक्रम महाराष्ट्रातल्या लोकांना आवडतात.
हे पुस्तक संदभार्साठी सर्वांनाच उपयोगी येईल, असे पंतप्रधान या वेळी बोलताना म्हणाले. जोपर्यंत सरकारमध्ये लोकांचा सहभाग वाढत नाही, तोवर कुठलीच योजना यशस्वी होऊ शकत नाही. सरकारचे यश हे जनतेच्या सहभागावरच अवलंबून असते, असेही ते म्हणाले.
या पुस्तकात सामाजिक, आर्थिक, राजकीय, प्रशासन, पर्यावरण, शेती, साहित्य अशा विविध विषयांवरची पंतप्रधानांची अभ्यासपूर्ण भाषणे घेण्यात आली आहेत.

Web Title: Publication of 'Sabka Ke ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.