CoronaVirus: शपथ घेतल्यावर ४८ तासांत पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामींना कोरोनाची लागण; चेन्नईत उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 10:51 AM2021-05-10T10:51:57+5:302021-05-10T10:54:39+5:30

CoronaVirus: शपथ विधीनंतर केवळ ४८ तासांत एन. रंगास्वामी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.

puducherry cm n rangaswamy tested corona positive | CoronaVirus: शपथ घेतल्यावर ४८ तासांत पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामींना कोरोनाची लागण; चेन्नईत उपचार सुरू

CoronaVirus: शपथ घेतल्यावर ४८ तासांत पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री रंगास्वामींना कोरोनाची लागण; चेन्नईत उपचार सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देपुदुच्चेरीचे मुख्यमंत्री रंगासामींना कोरोनाची लागणचेन्नईत उपचार सुरूशुक्रवारी घेतली होती मुख्यमंत्रीपदाची शपथ

चेन्नई: देशभरातील पाच राज्यातील निवडणुका पार पडल्या. पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कौल मिळाल्यानंतर एन. रंगास्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, शपथ विधीनंतर केवळ ४८ तासांत एन. रंगास्वामी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. रंगास्वामी यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. (puducherry cm n rangaswamy tested corona positive) 

पुदुच्चेरीच्या आरोग्य विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना चेन्नईतील खासगी रुग्णालयांत पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. आता रंगास्वामी यांची प्रकृती स्थिर आहे. पुदुच्चेरीमधील इंदिरा गांधी सरकारी मेडिकल कॉलेज येथे रंगास्वामी यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, असे सांगितले जात आहे. 

उत्तर प्रदेशमधील आरोग्य अधिकारी फोनही उचलत नाहीत; केंद्रीय मंत्र्याचे योगींना पत्र

शुक्रवारी घेतली होती मुख्यमंत्रीपदाची शपथ

एन. रंगास्वामी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर आरोग्य विभागाकडून १८३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली. याशिवाय, पुदुच्चेरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक २६ जणांचा मृत्यू झाला. तर, १६३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. पुदुच्चेरीत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ७१ हजार ७०९ झाली आहे, अशी माहिती मिळाली आहे. 

तुमच्या देवाचे हात रक्ताने माखले आहेत; अमेरिकेतील मोदी भक्तांना खुले पत्र

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी दिवसभरात ३ लाख ६६ हजार १६१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५३ हजार ८१८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत ३ हजार ७५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात ३७ लाख ४५ हजार २३७ रुग्ण उपचार घेत आहेत. देशात आतापर्यंत १७ कोटी ०१ लाख ७६ हजार ६०३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.  
 

Read in English

Web Title: puducherry cm n rangaswamy tested corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.