CoronaVirus News: ज्याची कोरोना टेस्ट होतेय, 'तो' पॉझिटिव्ह येतोय; 'हा' जिल्हा सगळ्यांची चिंता वाढवतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 04:55 PM2021-05-12T16:55:35+5:302021-05-12T16:55:54+5:30
CoronaVirus News: जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट ९६.९ टक्क्यांवर; देशात सर्वाधिक असल्यानं प्रशासन चिंतेत
पुद्दुचेरी: देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं सर्वांची चिंता वाढवली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांमधील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे. गेल्या मार्च महिन्यापासून देशावर कोरोनाचं संकट आहे. काल दिवसभरात देशात सर्वाधिक कोरोना मृत्यूंची नोंद झाली. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र असताना अनेक राज्यांमध्ये मात्र कोरोनाचा कहर सुरू आहे.
बाटलीत मूत आणि त्यानंच हात धू; सॅनिटायझर मागणाऱ्या कोरोना रुग्णाला अधिकाऱ्याचं उर्मट उत्तर
केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये कोरोना वेगानं हातपाय पसरत आहे. गेल्या २४ तासांत २ हजार ४९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३० जणांचा मृत्यू झाला आहे. पुद्दुचेरीत सध्या १४ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुद्दुचेरीतल्या यनम जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट देशात सर्वाधिक आहे. इथे होणाऱ्या एकूण कोरोना चाचण्यांपैकी ९६.९ टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत.
Fact Check: कोरोनाची 'थर्ड स्टेज' अन् कलेक्टरच्या 'त्या' २० सूचना; जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य
कोरोना पॉझिटिव्हिटी दर जास्त असणं याचा अर्थ चाचण्या होत असलेल्या रुग्णांची अवस्था गंभीर असून ते आतापर्यंत समोर आलेले नाहीत असा होतो. आदर्श स्थितीत हा दर ५ टक्क्यांच्या खाली असायला हवा. पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांखाली असल्यास याचा अर्थ परिस्थिती नियंत्रणात आहे असा होतो. पुद्दुचेरीच्या यनम जिल्ह्यात हा रेट जवळपास १०० टक्के आहे. गेल्या आठवड्यात देशातील १७ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट ४८ टक्क्यांच्या वर होता. यातील बहुतांश जिल्ह्यात ग्रामीण भाग अधिक आहे.
काल दिवसभरात ३० रुग्णांचा मृत्यू
पुद्दुचेरीत काल दिवसभरात ३० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये एका १४ वर्षीय मुलीचा समावेश आहे. या मुलीला मधुमेह होता. याशिवाय मृतांमध्ये एका २५ वर्षीय तरुणीचा समावेश आहे. तिला कोणताही आजार नव्हता. पुद्दुचेरीत आतापर्यंत कोरोनाच्या ७५ हजार २४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ५९ हजार १७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. पुद्दुचेरीचा रिकव्हरी रेट देशाच्या सरासरीपेक्षा कमी आहे.