Pulwama Attack : युद्ध नको, ‘विंटर नीती’ अवलंबा, देशभर दु:ख, संताप अन् बदल्याची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 04:56 AM2019-02-17T04:56:09+5:302019-02-17T05:12:55+5:30

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या.

Pulgama Attack: No war, 'Winter strategy' assurances, sadness and transformation feeling throughout the country | Pulwama Attack : युद्ध नको, ‘विंटर नीती’ अवलंबा, देशभर दु:ख, संताप अन् बदल्याची भावना

Pulwama Attack : युद्ध नको, ‘विंटर नीती’ अवलंबा, देशभर दु:ख, संताप अन् बदल्याची भावना

Next

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!

युद्ध नको, ‘विंटर नीती’ अवलंबा
काश्मीर मिळविण्यासाठी दोन युद्धात हरूनही पाकिस्तानने प्रयत्न चालूच आहेत. पुलवामातील हल्ला हा त्याचाच भाग. दुसऱ्या युद्धात रशियाने ‘विंटर नीती’ अवलंबून जर्मन सैन्य अन्न पाण्यावाचून मारले आणि त्यांचा पराभव केला. पाकिस्तानची जगभरातून रसद बंद करुन निर्णायक घाव घालायचा. अशी रणनीती खेळण्याचा धूर्तपणा मोदींकडे आहे.
- कमलाकर बडवे, ४९८, नारायण पेठ, पुणे.

कठोर उपाययोजनांची गरज
अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने जशी कठोर पावले उचलली तशी भारतानेही उचलण्याची गरज आहे. दहशतवाद हा विषय सर्व जगासाठी चिंतेचा आहे. त्यामुळे भारताने निर्णायक पाऊल उचलल्यास जगभरातून निश्चितच पाठिंबा मिळेल.
- माणिकराव गावीत, नवापूर - नंदुरबार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री.

दबाव वाढवा
भारताविरुद्धच्या दहशतवादाला पाकिस्तानची रसद आहे. त्यांना चीनदेखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करते. युद्धाच्या पटलावर असे नेपथ्य असताना सर्व राजकीय पक्षांनी दबाव वाढविण्यासाठी अगोदर एकत्र आले पाहिजे. २४ तास सुरक्षा देणाºया सैनिकांकडून एखादी चूक होऊ शकते. नेहमी सर्जिकल स्ट्राईक करणेही योग्य नाही. नियोजन केल्यास आपण अतिरेक्यांना चपराक बसणारे उत्तर देऊ शकतो.
- विजय नातू, निवृत्त ब्रिगेडीयर, चाळीसगाव, जि. जळगाव.

पाकची आर्थिक कोंडी करा
विरोधी पक्षात असताना ‘पाच के बदले पचास’ म्हणणारे सत्तेत आल्यावर मात्र अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी ठोस कृती करीत नाही. केवळ सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तान सुधारणार नाही त्याही पेक्षा मोठी कारवाई करावी लागेल. दहशतवाद्यांना मदत करणाºया पाकिस्तानसारख्या सर्वच देशांची आर्थिक कोंडी करावी.
- श्याम बसप्पा ठाणेदार, दौंड, जि. पुणे

धर्मप्रमुखांनी एकत्र यावे
सर्व धर्मप्रमुखांनी एकत्र बसून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी विचार करण्याची गरज आहे. कारण सध्याचा दहशतवाद हा धार्मिक आधारावर होत असल्याचे दिसते किंवा तसे धार्मिक आधाराचे वलय त्याला प्राप्त झालेले आहे. म्हणून मूठभर लोकांकडून होत असलेला हा दशतवाद रोखण्यासाठी धर्म प्रमुखांनीच पुढे यायला हवे.
- डॉ. दत्ताराम देसाई, (समाजसेवक), सावईवेरे-फोंडा, गोवा

Web Title: Pulgama Attack: No war, 'Winter strategy' assurances, sadness and transformation feeling throughout the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.