Pulwama Attack : 'नको आरक्षण, नको मंदिर, नको तुमचे १५ लाख, मोदीजी फक्त 40 च्या बदल्यात 400 हवेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 05:27 AM2019-02-17T05:27:38+5:302019-02-17T05:28:33+5:30

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या.

Pulwama Attack: 'No reservation, no temple, no, you do not have 15 lakhs, Modiji should convert only 40 to 400 in 400. | Pulwama Attack : 'नको आरक्षण, नको मंदिर, नको तुमचे १५ लाख, मोदीजी फक्त 40 च्या बदल्यात 400 हवेत.

Pulwama Attack : 'नको आरक्षण, नको मंदिर, नको तुमचे १५ लाख, मोदीजी फक्त 40 च्या बदल्यात 400 हवेत.

Next

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!
 

राष्ट्रीय आपत्ती जाहीर करा

या हल्ल्याला केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावे. तसेच सात दिवसांचा दुखवटा जाहीर करावा. त्यामुळे शहीद जवान व त्यांच्या कुटुंबीयांप्रती सन्मान व देशातील एकता यातून दिसून येईल. युद्धासाठी सर्वांनी तयार रहायला हवे. बाह्य आणीबाणी घोषित करावी. हल्ला हाच संरक्षणाचा सर्वात मोठा मार्ग आहे.
- राम कोरके, सेवानिवृत्त नायक, तोफखाना रेजिमेंट

मर्यादित युद्धाचा विचार करावा
भारताने पाकिस्तानसोबत मर्यादित युद्धाचा विचार करावा. पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या अनेक नद्यांचे पाणी अडवून गोची करावी. बलुचिस्तान हा प्रांत पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी आज धडपड करत आहे. भारताने बलुच नेत्यांना शक्य ती सर्व मदत करावी. काश्मीरमधील अनेक भारतीय राजकारणी पाकिस्तानधार्जिणे धोरण राबवताना दिसतात. त्यांच्या नांग्या ठेचाव्यात.
- आशिष पाटील, संभाजीनगर, कोल्हापूर.

धमाका करा
शहीद भगत सिंग यांनी ब्रिटिश काळात जसे असेम्बलीमध्ये बॉम्ब फेकला आणि त्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की ‘बहरो को सुनाने के लिये धमाको की जरूरत होती है’ अगदी त्या प्रमाणे भारत सरकारलासुद्धा असेच काही पाऊल उचलावे लागणार आहे. त्याशिवाय दहशतवादी आणि पाकिस्तान यांचे कंबरडे मोडणार नाही. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला संपवला. भारतानेसुद्धा तसेच भीषण सर्जिकल स्ट्राइक करून संपूर्ण दहशतवाद संपवावा.
- वैभव आसरकर, अकोट, जि. अकोला

घरभेद्यांचा बंदोबस्त करा
काश्मीरचा विशेष दर्जा काढावा, माजी सैनिक व इतर राज्यातील इच्छुक नागरिकांना काश्मिरमध्ये रहाण्याची परवानगी द्यावी. सच्च्या भारतीयांची संख्या वाढल्यास पाकिस्तानी धार्जिणे लोकांवर आपोआपच वचक बसेल. सैनिकी कारवायांमध्ये अडचणी निर्माण करणे, दहशतवाद्यांना मदत करणे, अशा कामे करणाºया घरभेद्यांचा कायमचा बंदोबस्त करावा.
- दिलीपकुमार खिस्ते,
कामोठे, ता. पनवेल जि. रायगड

जशास तसेच उत्तर हवे
जशास-तसे उक्ती प्रमाणे आता खुले-आम सामना केला तरच दहशतवाद्यांवर जरब बसेल. कआज आपले राष्ट्र दहशतवाद्यांसाठी प्रयोगशाळा झाली आहे, दहशतवादाचे वेग-वेगळे प्रयोग खुले-आम होत आहेत अशावेळी आपण स्वत: खंबीर असतांना वाट का बघतो? कुठलाही राजकीय हेतू अथवा मनसुबा न बाळगता दहशतवादी अड्डे असलेल्या देशांना संघटीतपणे धडा शिकवणे योग्य ठरेल.
- प्रमोद सुभाषराव डांगे (कुलकर्णी) नक्षत्रवाडी, औरंगाबाद.

दहशतवाद संपवा
भारतीय सैन्यदलावर झालेला भ्याड हल्ला हा भारतातील प्रत्येक जाती-धर्मातील लोकांवर झालेला हल्ला आहे. ना हिंदु - ना मुस्लीम, ना सिख - ना इसाई, आम्ही फक्त आणि फक्त भारतीय आहोत. सर्जिकल स्ट्राईकनंतर परत हा हल्ला झाल्याने पाकिस्तानने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच दिसते. म्हणूनच त्यांना आता कायमचे संपवण्याची गरज भारतातील प्रत्येक नागरिकास वाटते आहे.
- प्रशांत माळी, मु.पो. मापटेमळा
ता. आटपाडी, जि. सांगली

पाकची कोंडी करा
पुलवामातील दहशतवाद्यांच्या अमानवीय, क्रूर हल्याचा मी निषेध करतो तसेच शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो. केवळ सर्जिकल स्ट्राईक करुन भागणार नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची सर्व पातळ्यांवर कोंडी करुन जगापुढे त्यांना उघडे पाडावे लागेल.
- साजेद खान, औरंगाबाद

राष्ट्रीय कायदा बनवा
दहशतवादाला कायदा आणि सुरक्षेच्या प्रश्नावरच केंद्रीय गुन्हा (फेडरल क्राइम) मानले गेले पाहिजे आणि हा गुन्हा रोखण्यासाठी अमेरिकेतील ‘होमलँड सेक्युरिटी अ‍ॅक्ट’च्या धर्तीवर भारतात एक सर्वसमावेशक राष्ट्रीय कायदा बनवायला हवा.
- लालन शर्मा, 9673902887


एक महिन्याचा पगार देतो
पुलवामामध्ये झालेल्या हल्याचा मी निषेध करतो. मी एक सरकारी कर्मचारी आहे, आणि अस काही ऐकल की तळपायाची आग मस्तकात जाते. दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मी माझी एक महिन्याचा पगार द्यायला तयार आहे. देशाचे पंतप्रधान एक धाडसी निर्णय घेतील आणि त्यांना सडेतोड उत्तर देतील अशी मला अपेक्षा आहे.
- उदेश पवार, (वाहतूक नियंत्रण) नवी मुंबई महानगर पालिका

ना मंदिर, ना आरक्षण चाहिये, ना १५ लाख चाहीये, बस मोदीजी अब ४० के बदले ४०० चाहिये.
- अरविंद जाधव, खडका, घनसावंगी, जि.जालना

Web Title: Pulwama Attack: 'No reservation, no temple, no, you do not have 15 lakhs, Modiji should convert only 40 to 400 in 400.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.